अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 02:40 PM2024-06-17T14:40:12+5:302024-06-17T14:41:23+5:30

संस्कृती बालगुडे हिनं आपल्या लांबसडक केसांवर कात्री फिरवली आहे.

Actress Sanskriti Balgude hair donation Shared video In New Hair Style | अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली....

अभिनेत्री संस्कृती बालगुडेनं केलं हेअर डोनेशन, बदललेला लूक पाहून चाहते थक्क, व्हिडीओ शेअर करत म्हणाली....

मुलींना आपलं सौंदर्य हे सर्वात प्रिय असतं. आपल्या सौंदर्यात कुठलीही कमतरता असू नये अशी त्यांची इच्छा असते, त्यात एखाद्या मुलीला आपल्या केसांवर असलेले प्रेम तर विचारायलाच नको. पण, आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत अभिनेत्री संस्कृती बालगुडे हिनं नव्या लूकसाठी केसांना कात्री लावली. याचा एक व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. संस्कृती आपल्या पर्सनल आणि प्रोफेशन लाईफबाबतची सगळी माहिती चाहत्यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून देत असते. 

संस्कृती बालगुडे हिनं आपल्या लांबसडक केसांवर कात्री फिरवली आहे.  यानंतर तिचे रुपच बदलून गेले.अभिनेत्रीचा हा बदललेला लूक पाहून चाहतेही थक्क झालेत. संस्कृतीनं इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात ती ब्युटी सलूनमध्ये आपले केस कापताना दिसून येत आहेत. हे केस ती दान करणार असल्याचं संस्कृतीनं सांगितलं. तिचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय. 

संस्कृतीनं व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमधून नेहमी बाहेर पडावं अशी आयुष्याची इच्छा असते. मग ते एखाद्या सिनेमासाठी असो किंवा पात्रासाठी. पण, जेव्हात तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर पडता, तेव्हा तुम्ही याआधी कधीही घेतली नाही, अशी झेप घेता! तर हे का? कधी? कशासाठी केलय याचा, उलकडा लवकर होईल'. संस्कृतीनं नव्या लूकमध्ये एक खास फोटोशूटही केलं आहे. यात तिनं तिची नवी हेअरस्टाइल फ्लाँट केली आहे.

संस्कृतीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर 'पिंजरा' या मालिकेत आनंदी ही भूमिका साकारुन ती घराघरात लोकप्रिय झाली. त्यानंतर काही मालिका, सिनेमामध्ये झळकली. संस्कृती 'काळे धंदे' या वेबसीरिजमध्येही झळकली होती. मात्र, आता तिने थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्याचं म्हटलं जात आहे. 'करेज' या बॉलिवूड सिनेमात ती झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात ती नेमकी कोणती भूमिका साकारणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. 
 

Web Title: Actress Sanskriti Balgude hair donation Shared video In New Hair Style

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.