२०२० मध्ये रसिकांना पाहायला मिळणार सायली संजीवचा नवीन अंदाज, या कलाकारांच्याही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 06:30 AM2019-12-25T06:30:00+5:302019-12-25T06:30:00+5:30

‘दाह’ या सिनेमाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या सिनेमात अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

Actress Sayali Sanjeev New Marathi Movie Releasing In 2020 | २०२० मध्ये रसिकांना पाहायला मिळणार सायली संजीवचा नवीन अंदाज, या कलाकारांच्याही भूमिका

२०२० मध्ये रसिकांना पाहायला मिळणार सायली संजीवचा नवीन अंदाज, या कलाकारांच्याही भूमिका

googlenewsNext

प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:ख सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. मग ती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा एक नवा कोरा मराठी सिनेमा ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ नवीन वर्षात रसिकांच्या भेटीस येतोय.


‘दाह’ या सिनेमाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या सिनेमात अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

‘दाह’ सिनेमाची कथा ही कौटुंबिक आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि डॉक्टर साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी ‘दिशा’च्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. पण हा आनंद किती काळ टिकेल? दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे या सिनेमात मिळतील.

 

सिनेमाच्या कथेसह यामधील गाणी देखील थेट प्रेक्षकांच्या काळजाला भिडतील अशी तयार करण्यात आली आहेत. संगीतकार प्रफुल्ल स्वप्निल यांनी गाण्यांना संगीत दिले आहे तर प्रत्येक शब्दांतून सुंदर अर्थ मांडणारे गीतकार मंदार चोळकर आणि तेजस रानडे यांनी गाण्यांचे बोल लिहिले आहेत. संगीतकार आणि गीतकार यांनी तयार केलेल्या गाण्यांना स्वप्नील बांदोडकर, मनिष राजगिरे, अनिरुध्द वानकर, बेला शेंडे आणि मधुश्री यांनी आवाज दिला आहे.


मनाला भिडणा-या ‘दाह’ सिनेमाची पटकथा उन्मन बाणकर आणि कौस्तुभ सावरकर यांनी लिहिली आहे तर संवाद कौस्तुभ सावरकर यांचे आहेत. सायली संजीवचा नवा सिनेमा आणि नवीन भूमिका असलेला ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ हा सिनेमा येत्या नवीन वर्षात प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Actress Sayali Sanjeev New Marathi Movie Releasing In 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.