आई - वडिलांचा विरोध असताना 'या' व्यक्तीने सायलीला अभिनयासाठी दिला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 03:54 PM2024-03-02T15:54:14+5:302024-03-02T15:54:58+5:30
महाराष्ट्राची क्रश सायली पाटीलने नुकत्याच एका मुलाखतीत भावूक करणारा किस्सा सांगितला
अभिनेत्री सायली पाटील ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. सायलीला आपण आजवर नागराज मंजुळेंच्या 'झुंड' आणि 'घर, बंदूर, बिर्याणी' असा सिनेमांतून अभिनय करताना पाहिलंय. सायलीला महाराष्ट्राची क्रश असं ओळखलं जातं. 'घर, बंदूर, बिर्याणी' जेव्हा रिलीज झाला तेव्हा सायलीची खुप चर्चा झाली. नुकतंच प्लॅनेट मराठीला दिलेल्या मुलाखतीत सायलीने तिला घरातून विरोध असताना एक व्यक्ती तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचा खुलासा केला.
सायलीने अलीकडेच प्लॅनेट मराठीला मुलाखत दिली. त्यात ती म्हणाली, "माझी आजी माझ्या खुप जवळची होती. मी कोविडमध्ये तिला गमावलं. माझ्या घरात सिनेमांविषयी थोडं वेगळं वातावरण होतं. म्हणजे सैराटच्या वेळी आई म्हणाली होती, की तू घरातून निघून जा. मी तुला नाही करुन देणार. आणि माझी आजी म्हणाली.. तू करायचंच आहेस काहीही करुन."
सायली पुढे म्हणाली, "माझी आजी एवढी उत्सुक होती की तिला स्क्रीनींगला येऊन शिट्टी वगैरे वाजवायची होती. आणि कोविडमध्ये ती वारली. ती जाण्याआधी तीन - चार दिवस तिला माझ्याशी व्हिडीओ कॉलवर बोलायचं होतं. त्यामुळे मी आज जे काही आहे ते तिला डेडीकेट करते," असं सायली म्हणली. सायलीने 'झुंड' आणि 'घर, बंदूर, बिर्याणी' या दोन सिनेमाच्या माध्यमातून तिच्या अभिनयाची छाप पाडलीय.