गारवा अल्बमध्ये Sunil Barve सोबत झळकली होती ही अभिनेत्री, आता दिसते बघा कशी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 13:45 IST2021-12-24T13:41:50+5:302021-12-24T13:45:13+5:30
अभिनयासोबत मनं जिंकलेल्या स्मिता (Smita Bansal) 8 डिसेंबर 2000 साली कुश मोहलासोबत विवाहबंधनात अडकली. स्मिताला दोन मुली असून स्ताशा आणि अनघा अशी त्यांची नावं आहेत. सध्या संसारात रमेलेली स्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते.

गारवा अल्बमध्ये Sunil Barve सोबत झळकली होती ही अभिनेत्री, आता दिसते बघा कशी?
१९९८ साली मिलिंद इंगळे(Milind Ingle) यांचा गारवा हा अल्बम प्रदर्शित झाला होता. या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. मराठीत पावसावर आधारित गाणं असल्याने अल्बमने धुमाकुळ घातला होता. बघावं तिथे हेच गाणे सुरु असल्याचे कानावर यायचे. या गाण्याला इतकी वर्ष झाली असली तरी आजही तितकेच ऐकले जाते. सुनील बर्वे (Sunil Barve) आणि स्मिता बन्सल(Smita Bansal) ही नवीन जोडी गारवा या अल्बममधून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.
स्मिता बंसलने 'इतिहास', 'कहाणी घर घर की', 'बालिका वधू', 'कोरा कागज', 'आशीर्वाद', 'सरहदे', 'अमानत' अशा अनेक गाजलेल्या मालिकांमधून आपल्या भूमिकांनी रसिकांची मनं जिकंली आहेत. हिंदी मालिकेत काम केल्यामुळे स्मिता बंसलची रसिकांच्याही चांगलीच परिचयाची होती. 2008 साली आलेल्या 'कर्ज' सिनेमातही तिने भूमिका केली होती. मात्र मराठी अल्बमध्ये झळकल्यामुळे मराठी रसिकांमध्येही तिची चांगलीच लोकप्रियता पाहायला मिळाली. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे स्मिताने सा-यांचे लक्ष वेधून घेतले होते. हे गाणे फक्त मराठीच नाही तर इतर भाषिक रसिकांमध्येही प्रसिद्ध झाले होते.
अभिनयासोबत मनं जिंकलेल्या स्मिता 8 डिसेंबर 2000 साली कुश मोहलासोबत विवाहबंधनात अडकली. स्मिताला दोन मुली असून स्ताशा आणि अनघा अशी त्यांची नावं आहेत. सध्या संसारात रमेलेली स्मिता सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. तिच्या सगळ्या घडामोडी सोशल मीडियाच्यामाध्यमातून समोर येत असतात.
करिअरच्या सुरुवातील जशी स्मिता दिसायची अगदी तशीच ती आजही दिसते. तिचे सौंदर्य आजही अबाधित आहे. स्मिताने वयाची 43 वर्षे पूर्ण केली आहेत तरीही तिच्या फोटोंकडे पाहिले असता तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही. फिट राहावं आणि सौंदर्य टिकून राहावं यासाठी स्मिता बरीच मेहनत घेते.