'या' मराठी अभिनेत्रीने केले होते चक्क पारंपरिक वारसा जपणा-या वाड्यात लग्न, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:28 AM2019-10-18T11:28:27+5:302019-10-18T11:34:22+5:30

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.

Actress Surabhi Hande Unseen wonderful Traditional Heritage wedding Pics,you will find it interesting | 'या' मराठी अभिनेत्रीने केले होते चक्क पारंपरिक वारसा जपणा-या वाड्यात लग्न, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

'या' मराठी अभिनेत्रीने केले होते चक्क पारंपरिक वारसा जपणा-या वाड्यात लग्न, फोटो पाहून तुम्हालाही वाटेल कौतुकास्पद

googlenewsNext

प्रत्येक मुलीला आपला लग्नसोहळा हा खास असावा, हटके असावा अशी स्वप्न रंगवत असतात. लग्नसोहळा म्हटला की तो प्रत्येकासाठी खासच असतो. अशीच काहीशी इच्छा कदाचित अभिनेत्री सुरभी हांडेचीही असावे. याच वर्षी फ्रेबुवारीमध्ये दुर्गेश कुलकर्णी सोबत सुरभी विवाबंधनात अडकली असली तरीही लग्नाच्या आठ महिन्यानंतर सुरभीच्या लग्नाचे फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत. मोठ्या थाटात हा विवाहसोहळा संपन्न झाला होता. सुरभीचे लग्न हे थोडे खासच म्हणावे लागेल कारण पुण्याजवळील ढेपेवाडा येथे चक्क पारंपरिक वारस जपणारा वाडा बांधण्यात आला होता. 

तिथे पारंपरिक पद्धतीने सुरभीचे लग्न लागले होते. अनेक मराठी कलाकार आता अशाच पारंपरिक पद्धतीने लग्न करण्यासाठी अशाच वाड्यात लग्न करताना पाहायला मिळतात. आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी हा केलेला खटाटोप खरंच कौतुकास्पद म्हणावा लागेल. समोर आलेल्या फोटोंमध्ये नववधू सुरभि हांडेचा अंदाज कोणालाही घायाळ करणारा असाच पाहायला मिळाला.

नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती  शेअर केलेल्या या फोटोत पाहायला मिळतेय.सुरभी आणि दुर्गेशमध्ये चांगलीच केमिस्ट्री असल्याचे दोघांचे एकत्र फोटो पाहून दिसते. पौराणिक मालिकेतून सुरभी म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती. 

Web Title: Actress Surabhi Hande Unseen wonderful Traditional Heritage wedding Pics,you will find it interesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.