सीझर डिलीव्हरीही तितकीच नैसर्गिक ! ट्रोल करणाऱ्यांची उर्मिला निंबाळकरने केली बोलती बदं,म्हणाली....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 01:59 PM2021-08-12T13:59:28+5:302021-08-12T14:05:42+5:30

उर्मिलाने निंबाळकरने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती.

Actress Urmila Nimbalkar slams trolls for sending negative comments on her C-Section Delivery | सीझर डिलीव्हरीही तितकीच नैसर्गिक ! ट्रोल करणाऱ्यांची उर्मिला निंबाळकरने केली बोलती बदं,म्हणाली....

सीझर डिलीव्हरीही तितकीच नैसर्गिक ! ट्रोल करणाऱ्यांची उर्मिला निंबाळकरने केली बोलती बदं,म्हणाली....

googlenewsNext

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने नुकते बाळाला जन्म दिला. प्रेग्नंसी दरम्यान उर्मिला सुपर अक्टीव्ह होती. जास्त विश्रांती न करता तिचे कामही सुरुच होते. उर्मिलाही युट्युबर आहे. सोशल मीडियावर भटकंतीचे व्हिडीओ शेअर करत असते. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहून विविध गोष्टी शेअर करताना दिसते.

काही दिवसांपूर्वीच मराठमोळ्या पारंपरिक पद्धतीने डोहाळं जेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. या कार्यक्रमाचा व्हिडीओही तिने शेअर केला होता.तसेच मुलगा झाल्याची गोड बातमी उर्मिलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली होती.चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला होता.

 बाळाला जन्मानंतर उर्मिला पुन्हा चर्चत आली आहे. मुळात ट्रोल करणा-यांनाच तिने दिलेले सणसणीत उत्तर आहे. भली मोठी पोस्ट शेअर करत तिने  C Section डिलेव्हरीबद्दल आपले मत मांडले आहे. तसेच यावर आपली वेगवेगळी मत मांडणारे नको त्या ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. 

उर्मिलाने लिहीले की, योग्य आहार आणि व्यायाम हे चोख पार पाडून मीही नॉर्मल डिलेव्हरी होण्याच्या प्रयत्नांतच होते आणि normal साठीच प्रयत्न करायला हवा परंतु कोणत्याही योग्य वैद्यकीय कारणांमुळे झालेली सीझर डिलीव्हरीही तितकीच नॉर्मल आणि नैसर्गिक आहे त्यात त्या स्त्रीला नावं ठेवण्याचे कारण नाही. Normal असो वा C section,बाळ आणि आई सुदृढ असण्याला प्राधान्य हवे.

अनेक चाहत्यांनी उर्मिला निंबाळकरने शेअर केलेल्या अनुभवाचेही कौतुक करताना दिसत आहे. उर्मिलाच्या या पोस्टवर अनेक सकारात्मक कमेंट्सही उमटल्या आहेत. एका युजरने म्हटले की, असे खच्चीकरण करणं मुळीच चुकीचं आहे. C section is also good. For both baby and Mom. माझीही C-Section डिलेव्हरी झाली आहे. मुळात आता हे नॉर्मल डिलिव्हरी  c section मधलं अंतर संपवलं पाहिजे. नेहमीप्रमाणे बिनधास्त आणि बेधडक बोलणारी उर्मिलाने यावेळीही प्रेग्संसीदरम्यानही तिला आलेले वेगवेगळे अनुभव शेअर केले होते.

नऊ महिने आपल्या गर्भारपणाचा उर्मिलाने पुरेपूर आनंद घेतला होता. त्यावरून सोशल मीडियावर तिला ट्रोलही करण्यात आलं होतं. परंतु, उर्मिलानेही सडेतोड उत्तर देत ट्रोलर्सची बोलती बंद केली होती. त्यामुळे डिलेव्हरीनंतरही उर्मिलाने आपला अनुभव शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 उर्मिलाने निंबाळकरने मराठीसह हिंदीतही काम केले आहे. 'दिया और बाती हम' , 'मेरी आशिकी तुमसेही' या हिंदी मालिकेत ती झळकली आहे. या शिवाय मराठी मालिका 'दुहेरी' विशेष गाजली होती. मालिकेतल्या उर्मिलाच्या भूमिकेचे विशेष कौतुक झाले होते.
 

Web Title: Actress Urmila Nimbalkar slams trolls for sending negative comments on her C-Section Delivery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.