अभिनेत्री उषा जाधवला 'नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार प्रदान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2018 03:42 PM2018-10-15T15:42:47+5:302018-10-15T15:50:32+5:30
स्त्री शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सावली फाऊंडेशन’चे संस्थापक गणेश जाधव दरवर्षी नवरात्री दरम्यान ‘नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
स्त्री शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सावली फाऊंडेशन’चे संस्थापक गणेश जाधव दरवर्षी नवरात्री दरम्यान ‘नवशक्ती-नवचेतना' पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ‘नवशक्ती-नवचेतना पुरस्कार २०१८' चे तिसरे वर्ष होते. विविध नऊ क्षेत्रातील जिद्द आणि चिकाटीचा झरा असणाऱ्या, कर्तबगार, इतरांसाठी प्रेरक ठरतील अशा नऊजणींना 'नवशक्ती नवचेतना पुरस्कार २०१८' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सर्व पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते हे प्रदान केले गेले. चित्रपट-कला क्षेत्रातील पुरस्कार यंदा सिने अभिनेत्री उषा जाधवला प्रदान करण्यात आला.
ट्राफिक सिग्नल ह्या सिनेमामधून उषा जाधवने आपला सिनेक्षेत्रातील प्रवास सुरु केला. या नंतर अनेक सिनेमामध्ये संधी तिने कधीच मागे वळून पाहिलेच नाही. थॅन्क्स मा, दो पैसे की धूप, स्ट्रायकर, अशोक चक्र, धग, भूतनाथ, लखनौ टाईम्स, वीरप्पन असे दर्जेदार वास्तववादी चित्रपट उषाने काम केले . सोल्ट ब्रिज नावाचा ऑस्ट्रेलियन चित्रपटादेखील तिने काम केले. तसेच स्पॅनिश चित्रपटात काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे. धग या चित्रपटासाठी उत्कृष्ठ अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्कार तिला मिळविला आहे. ऐवढेच नाही तर वोग्स मॅगझिनमध्ये मुखपृष्ठावर देखील तिला मिळाले आहे . नवरात्री निमित्त ‘ती’ च्या कर्तबगारीचा' सन्मान सोहळा आयोजित केला होता.