'युवा तेजस्वी चेहरा' ठरली वैदेही परशुरामी, मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही निर्माण केली आहे स्वतःची वेगळी ओळख
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2020 03:17 PM2020-11-11T15:17:02+5:302020-11-11T15:20:36+5:30
वैदेही परशुरामी हिला 'युवा तेजस्विनी चेहरा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आपला दमदार अभिनय आणि सोज्वळ सौंदर्याने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे वैदेही परशुरामी. अभिनयासह नृत्य कलेतही ती पारंगत आहे. वैदेही सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती रसिकांसोबत संवाद साधत असते. शिवाय स्वतःचे फोटो आणि विचारही सोशल मीडियावर शेअर करते. तिने शेअर केलेला एक फोटो सध्या रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.
तिच्या कारकिर्दीला प्रोत्साहन देत वैदेहीचा सन्मान 'झी युवा सन्मान' सोहळ्यात करण्यात आला. वैदेही परशुरामी हिला 'युवा तेजस्विनी चेहरा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
विविध अंदाजातील तिचे फोटो रसिकांना नेहमीच भावतात. या ड्रेसमध्ये वैदेहीचे सौंदर्य आणखी खुलून गेल्याचे दिसत आहे.या फोटोवर वैदेहीच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे. वैदेहीने 'वेड लागी जीवा' या चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले. हिंदी चित्रपटसृष्टीचे शहेनशाह महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ती 'वजीर' चित्रपटातही झळकली होती.
'काशिनाथ घाणेकर'' चित्रपटात कांचन घाणेकर यांची भूमिका साकारून वैदेही परशुरामीने रसिकांची मनं जिंकली. काही महिन्यांपूर्वी रुपेरी पडद्यावर झळकलेल्या 'सिम्बा' चित्रपटात तिने रणवीर सिंहच्या बहिणीची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिकाही रसिकांना भावली होती.
सिम्बाची बहिण झाली फिटनेस फ्रिक, पहा तिचा हा Video
सध्या वैदेही फिटनेस फ्रिक झाली आहे. इतकेच नाही तर तिने वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. वैदेही परशुरामने सोशल मीडियावर वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती क्रंच पंच एक्सरसाईज व प्लँक्स करताना दिसते आहे. या व्हिडिओसोबत तिने म्हटले की, 'दुसऱ्यापेक्षा चांगले दिसणे म्हणजे फिटनेस नव्हे. तुम्ही आहात त्यापेक्षा फिट राहण्यासाठी फिटनेसकडे लक्ष दिले पाहिजे. '