आदिनाथ कोठारे बनला लेखक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2017 12:02 PM2017-06-19T12:02:54+5:302017-06-19T17:32:54+5:30
आदिनाथ कोठारेने छकुला या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली. झपाटलेला 2, सतरंगी रे, दुभंग यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने ...
आ िनाथ कोठारेने छकुला या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून त्याच्या कारकिर्दिला सुरुवात केली. झपाटलेला 2, सतरंगी रे, दुभंग यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने काम केले. तो 100 डेज या मालिकेतही काही महिन्यांपूर्वी झळकला होता. एक अभिनेता म्हणून त्याने मराठी चित्रपटसृष्टीत त्याचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे.
आदिनाथ केवळ एक चांगला अभिनेताच नाहीये तर एक निर्माता म्हणून देखील त्याने आपले नाव कमावले आहे. गणपती बाप्पा मोरया या मालिकेचा तो निर्माता असून ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. तसेच एक दिग्दर्शक म्हणून देखील लवकरच तो त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. अभिनय, निर्मिती यानंतर आता आदिनाथ एका वेगळ्या क्षेत्राकडे वळला आहे. तो आता लेखक बनला आहे.
आदिनाथने त्याचा ब्लॉग लिहायला सुरुवात केली असून फादर्स डेच्या निमित्ताने त्याने त्याचा पहिला ब्लॉग त्याच्या फॅन्सच्या भेटीस आणला आहे. त्याच्या पहिल्या लेखाचे नाव डॅडी असून हा लेख त्याने त्याच्या आजोबांविषयी लिहिला आहे. आदिनाथने त्याच्या आणि त्याच्या आजोबांच्या नात्याविषयी हा लेख लिहिला आहे. या लेखातून तो त्याच्या आजोबांविषयी किती हळवा आहे याची जाणीव होते. हृदयाला स्पर्श करून जाणारा हा लेख असून आदिनाथ एक अभिनत्यासोबत एक चांगला लेखक असल्याचीही यातून जाणीव होते. या लेखासोबत त्याने त्याच्या आजोबांसोबतच आणि वडील महेश कोठारे यांच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे.
आदिनाथ कोठारेचा हा लेख आतापर्यंत अनेकांनी वाचला असून त्यावर अनेकांनी प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. भविष्यात त्याचे अाणखी काही लेख भेटीस येतील अशी आशा करण्यास काही हरकत नाही.
Must read : मालिका देते एक नवी ओळख: आदिनाथ कोठारे