"मित्रांसोबत बिअर पिताना पकडलो गेलो..." प्रोफेसरने डॅडीकडे केली तक्रार; म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 03:30 PM2023-09-29T15:30:32+5:302023-09-29T15:31:03+5:30
आदिनाथने कॉलेजच्या आठवणी शेअर करताना एक गंमतीदार किस्सा सांगितला.
अभिनेता आदिनाथ कोठारे आणि (Adinath Kothare) त्याचे वडील महेश कोठारे (Mahesh Kothare) यांच्यात वडील मुलापेक्षा मित्रत्वाचं नातं अधिक आहे. महेश कोठारे अनेकदा मुलासोबत मस्ती मजाकच्या मूडमध्ये दिसले आहेत. पण आपल्या मुलाने जेव्हा पहिल्यांदा दारुचा घोट घेतला तेव्हा वडिलांची रिअॅक्शन काय होती याचा अनुभव आदिनाथने नुकताच एका मुलाखतीत शेअर केलाय.
आदिनाथने कॉलेजच्या आठवणी शेअर करताना एक गंमतीदार किस्सा सांगितला. तो म्हणाला,'एकदा आमची अलिबागला ट्रिप गेली होती. आम्ही तीन घट्ट मित्र जे आजही टचमध्ये आहोत. तर आम्ही मित्र सहलीत असताना एका लाईनमध्ये सगळे पोरं चालत असतात तसं चालत होतो. तेव्हा आम्हाला वाईन शॉप दिसलं. दारुबद्दल कुतुहूल होतंच तर आम्हीही एक बाटली घ्यायची असं ठरवलं. पण आम्ही दंगा करणारे मुलं आहोत हे प्रोफेसरना माहित होतं म्हणून ते आमच्या मागेच उभे राहिले.'
तो पुढे म्हणाला,'मी आयडिया केली आणि पुढे पुढे चालत गेलो. माझे मित्र बरेच मागे राहिले. एक माणूस दिसला त्याला बीच आणि वाईन शॉपचा रस्ता कुठंय विचारलं. तो विचार करत सांगणार तोवर मित्र आलेच. तेवढ्यात तो माणूस म्हणाला वाईन शॉप इधर, बीच उधर. सगळे माझ्याकडे पाहतच राहिले. मी गुपचूप खाली मान घालून तिथून पुढे चालत गेलो.'
नंतर कसंतरी करुन आम्ही बाटली मिळवलीच. ज्या बसमधून आम्ही प्रवास करत होतो त्या बसमध्ये रात्री जाऊन बसलो. दोन दोन घोट प्रत्येकाने घेतले. पण आम्हाला हे माहितच नव्हतं की बसमध्ये मागच्या सीटवर प्रोफेसर झोपले आहेत. दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांना प्रोफेसरने बोलावलं आणि ही गोष्ट सांगितली. पण मी डॅडना याबद्दल आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे ते प्रोफेसरला म्हणाले मला माहित आहे मी त्याला समजावेन. अशा प्रकारे तेव्हा ते शांततेत सॉर्ट झालं.'