कौतुकास्पद! मराठमोळ्या निर्मात्याने मजूर महिलेला मिळवून दिलं हक्काचं घर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 11:51 AM2024-10-30T11:51:43+5:302024-10-30T11:53:29+5:30

'हवाहवाई' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर आणि वर्षा उसगावकर यांनी पुण्यात अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलेची भेट घेतली होती आणि तिची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे मांडली होती.

Admirable! producer Mahesh Tilekar got the rightful house for the laboring woman | कौतुकास्पद! मराठमोळ्या निर्मात्याने मजूर महिलेला मिळवून दिलं हक्काचं घर

कौतुकास्पद! मराठमोळ्या निर्मात्याने मजूर महिलेला मिळवून दिलं हक्काचं घर

'हवाहवाई' सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने निर्माते-दिग्दर्शक महेश टिळेकर आणि वर्षा उसगावकर यांनी पुण्यात अपंगत्वावर मात करून जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महिलेची भेट घेतली होती आणि तिची प्रेरणादायी कहाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजापुढे मांडली होती. आता या महिलेचे स्वप्न आता मराठी निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी पूर्ण केले आहे.

महेश टिळेकर यांनी सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत लिहिले की, एका इमारतीच्या बांधकामावर मजूर म्हणून गरोदर सुनिता काम करत असताना सहकारी महिलेला विजेचा शॉक लागला म्हणून वाचवायला गेली आणि त्यात तिलाही अपघात होऊन कोपरा पासून दोन्ही हात गमवावे लागले. बायोकोची दयनीय अवस्था पाहून सुनीताचा नवरा तिला वाऱ्यावर सोडून पळून गेला. इतर कुणाचाही आधार नसलेली सुनिता आत्महत्या करायचा विचार करू लागली पण परमेश्वराने तिला काय बुद्धी दिली आणि तिला दुसऱ्या क्षणी वाटले की फक्त आपण आत्महत्या करत नाही तर आपल्या पोटातील बाळाची आणि पदरी असलेल्या एका मुलीची पण हत्या करून पाप करत आहोत. यातून स्वतः ला सावरत सुनिता ने एका पत्र्याच्या शेड मध्ये नव्याने जगायला सुरुवात केली.. अपंग असूनही घरातील सगळी कामे ती करायला शिकली आणि त्यात तरबेज झाली..मुलांना वाढवू लागली.

त्यांनी पुढे लिहिले की, सुनीताला शक्य तितकी मदत मी केली, तिच्या घरी मी आणि वर्षा उसगावकर गेलो होतो तेंव्हा तिने एक इच्छा व्यक्त केली की कुठे तरी भले एक खोली का असेना तिच्या डोक्यावर कायम स्वरूपी हक्काचं छप्पर असावे. त्यासाठी सरकारी योजनेतून मार्केट रेटपेक्षा स्वस्त घर मिळवण्यासाठी प्रयत्न केले. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी घर मंजूर केले.पण कागदपत्रे जमवताना अडचणी आल्या. स्थानिक नेत्याने मदत करतो असे बडेजाव करत सांगत सुनीताला महिनाभर चकरा मारायला लावून कामे केले नाहीच. तिचे फोन घेणे ही टाळू लागला. मग  मी ज्या ज्या अधिकाऱ्यानां फोन केले संपर्क साधला त्या प्रत्येकाने एका शब्दावर काम केले. अडचणीतून मार्ग निघत गेला. सरकारी घर मंजूर झाले तरी ते फुकट नसल्याने बाहेर पेक्षा कमी असले तरी पैसे भरावे लागणार होते.सुनीताला ती रक्कम ऐकून वाटले लाखो रुपये आणायचे कुठून. तिने " सर तुम्ही तरी किती करणार माझ्यासाठी.." असं म्हणत आशा सोडली. पण मी पैशाची व्यवस्था केली. सुनीताला फ्लॅटची चावी मिळाल्यावर सुनीताने माझ्या समोर तिला चकरा मारायला लावणाऱ्या स्थानिक नेत्याला फोन केल्यावर त्याने " तुझे काम होणे अवघड असे" असे सांगितल्यावर मी त्याला सुनीताचे घर झाले सांगत फोन वरून त्याला पोटभर  दिवाळीचा फराळ दिल्यावर मला समाधान मिळाले.

खरंच भगवान के यहां देर है अंधेर नहीं...

आज दिवाळी निमित्ताने पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी सुनिता हक्काच्या वन बी एच  के फ्लॅट मध्ये रहायला गेली. तिच्या नवीन घरात गेल्यावर  तिचे आणि तिच्या मुलांचे उजळलेले चेहरे पाहून वाटलं दिवाळीत दिव्यांनी लोक घर उजळतात आपण एका गरीब कुटुंबातील अंधार कायमचा दूर करून घर आयुष्य उजळवून टाकायला निमित्त मात्र ठरलो ही त्या परमेश्वराची कृपा.. खरंच भगवान के यहां देर है अंधेर नहीं...., असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
 

Web Title: Admirable! producer Mahesh Tilekar got the rightful house for the laboring woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.