कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 04:57 PM2023-02-06T16:57:32+5:302023-02-06T16:58:03+5:30

Sayaji Shinde : सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे.

Admirable...! Sayaji Shinde's unique formula to keep mother alive for 500 years; Appreciation is pouring in from all levels | कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

कौतुकास्पद...! आईला ५०० वर्षे जिवंत ठेवण्यासाठी सयाजी शिंदेंची अनोखी शक्कल; सर्व स्तरातून होतेय प्रशंसा

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी मराठी इंडस्ट्रीच नाही तर तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषिक चित्रपटात काम केले आहे. सयाजी शिंदे अभिनया शिवाय सामाजिक कार्यामुळेही चर्चेत येत असतात. मात्र यावेळेला ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होते आहे.

सयाजी शिंदे यांनी आपल्या आईला ५०० वर्ष जिवंत ठेवण्यासाठी अनोखी शक्कल लढवली आहे आणि त्यामुळे त्यांची आई ५०० वर्ष जगणारही आहे. त्यांनी नेमके काय केले असेल, हे जाणून घेण्यासाठी उत्सुक असाल ना...याबद्दल त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं. सयाजी शिंदेंनी आपल्या आईला जिवंत ठेवण्यासाठी तिच्या वजनाइतक्या बिया लावण्याचा निर्धार केला आहे. एका कार्यक्रमात आईबद्दल बोलताना सयाजी शिंदे म्हणाले, 'माझे माझ्या आईवर खूप प्रेम आहे. प्रत्येकाला वाटते त्याची आई खूप जगावी. माझी आई आयुष्यात कायम जिवंत राहायला हवी आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तो पर्यंत. मग ती कशी राहील? मी आईला म्हटले बघ तू काय ५०० वर्षे जगणार नाहीस. मला तू कायम जिवंत राहायला हवीस. 


ते पुढे म्हणाले की, मी एक काम करतो तुझ्या वजना इतक्या देशी झाडांच्या बियांची तुला करतो. एका बाजूला तुला ठेवतो. एका बाजूला बिया ठेवतो आणि तुझ्या वजनाइतक्या बिया महाराष्ट्रात लावतो. म्हणजे मग त्या झाडाला आलेल्या फुलांच्या सुगंधात तू असशील. त्या झाडांच्या फळामध्ये दिसशील, सावलीत असशील आणि कायम राहशील.


तसेच त्यांनी सांगितले की, 'झाडं लावायचे मी काही सामाजिक काम करत नाही. मला आवड आहे ती आणि आईला मी वचन दिले आहे तुझ्या वजनाएवढ्या बिया लावेन म्हणून मी ते काम करतो. मला वाटते प्रत्येकाने आपल्या आई वडिलांचे ऋण फेडायचे असेल तर माता आणि धरतीमाता यांच्याइतकी मोठी गोष्ट जगात नाही. तेवढे आपण सांभाळले तर बस आहे. आपण खूप मोठे झालो. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सयाजी यांनी 'सहयाद्री देवराई'च्या माध्यमातून आजवर महाराष्ट्रातील अनेक माळरानांवर झाडं फुलवली आहेत आणि ती जगवलीही आहेत.

Web Title: Admirable...! Sayaji Shinde's unique formula to keep mother alive for 500 years; Appreciation is pouring in from all levels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.