​दिलीप प्रभावळकरांनंतर आता शिवाजी साटम गेल्याची अफवा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2016 04:15 PM2016-12-21T16:15:41+5:302016-12-21T16:15:41+5:30

दिलीप प्रभावळकरांचे निधन झाले अशा पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या आणि आता सीआयडी या मालिकेत एसीपी ...

After Dilip Prabhavalkar, now the rumor has gone to Shivaji Satom | ​दिलीप प्रभावळकरांनंतर आता शिवाजी साटम गेल्याची अफवा

​दिलीप प्रभावळकरांनंतर आता शिवाजी साटम गेल्याची अफवा

googlenewsNext
लीप प्रभावळकरांचे निधन झाले अशा पोस्ट काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या आणि आता सीआयडी या मालिकेत एसीपी प्रद्युमनची भूमिका साकारणारे शिवाजी साटम यांचे निधन झाले असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी सीआयडी ही मालिका लवकरच बंद होणार असल्याच्या बातम्या येत होत्या. तसेच सीआयडी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणारे दया शेट्टी आणि शिवाजी साटम यांनी पुढील वर्षात मानधन वाढवून मागितले आहे. मालिकेत काम करण्यासाठी आता घेत असलेल्या मानधनाच्या तिप्पट मानधन दिल्यासच काम करणार असे त्यांनी म्हटले असल्याची चर्चा आहे. इतकी मोठी रक्कम देणे प्रोडक्शन हाऊसला शक्य नसल्याने त्यांनी ही मालिकाच बंद करण्याचे ठरवले असेही म्हटले जात होते आणि आता शिवाजी साटम यांचे हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले असल्याच्या बातम्या व्हॉटसअॅप या सोशल साईटवरून फिरत आहेत. या सगळ्या अफवा ऐकून आता शिवाजी साटमच कंटाळले आहेत. शिवाजी साटम याविषयी सांगतात, "माझी सीआयडी ही मालिका संपणार आहे. मालिका संपण्यापूर्वी माझा मृत्यू झाल्याचे दाखवण्यात येणार आहे. तसेच खऱ्या आयुष्यात माझे निधन झाले आहे अशा बातम्या जवळजवळ 4-5 दिवसांपासून व्हॉट्सअॅपवर फिरत आहेत. या ऐकून आता मलाच कंटाळा आला आहे. अशाप्रकारच्या अफवा पसरून कोणाला आनंद मिळतो हेच मला कळत नाही. या अफवांमुळे माझे नातलग आणि फ्रेंड्सचे सतत फोन येत आहेत. या अशा अफवांमुळे माझ्या जवळच्या लोकांना फुकटचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. माझी तब्येत पूर्णपणे चांगली असून माझ्याबाबतीत अशा अफवा कोणीही पसरवू नयेत असे मी माझ्या फॅन्सना सांगेन." 

Web Title: After Dilip Prabhavalkar, now the rumor has gone to Shivaji Satom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.