'वेड'नंतर रितेश देशमुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 03:34 PM2023-02-17T15:34:00+5:302023-02-17T15:34:34+5:30

Riteish Deshmukh : महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्कार सोहळ्यात रितेश देशमुखचा खास गौरव होणार आहे.

After 'Ved' Riteish Deshmukh gets another honor, becomes Maharashtra's favorite style icon | 'वेड'नंतर रितेश देशमुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन

'वेड'नंतर रितेश देशमुखच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, ठरला महाराष्ट्राचा फेव्हरेट स्टाईल आयकॉन

googlenewsNext

झी टॉकीज वाहिनीतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यात रितेशचा खास गौरव होणार आहे. वेड या सिनेमातून मराठी बॉक्स ऑफीसवर करोडोंची कमाई करून मराठी सिनेमाला कोटींच्या क्लबमध्ये नेणाऱ्या रितेशला झी टॉकीजतर्फे फेव्हरेट स्टाईल आयकॉन पुरस्कार देण्यात येणार आहे. वेड या मराठीतील हिट सिनेमासाठी महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण २०२२ या  पुरस्कारानेही रितेशला गौरवण्यात येणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेवरेट कोण? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे . प्रेक्षकांच्या पसंतीतूनच महाराष्ट्राचा फेवरेट कोण? या पुरस्कारावर नाव कोरलेल्या कलाकारांना या सोहळ्यात गौरवण्यात येणार असल्याने प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाची प्रचंड उत्सुकता आहे.

झी टॉकीज वाहिनी नेहमीच नव्या प्रयोगांना प्रोत्साहन देत असते. महाराष्ट्राचा फेवरेट कोण या स्पर्धेच्या औचित्याने गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या सिनेमातील विविध १२ विभागांमधून प्रेक्षकांची सर्वाधिक पसंती मिळालेल्या कलाकारांना झी टॉकीज सन्मानित करणार आहे. यामध्ये अभिनेता रितेश देशमुखने फेवरेट स्टाईल आयकॉनचा किताब पटकावला आहे. मराठी सिनेमाला एक स्टाईल देणाऱ्या रितेशने बॉलिवूडमधील स्टारडम असूनही मराठी सिनेमाच्या प्रेमापोटी केलेल्या कामासाठी त्याला हा पुरस्कार दिला जातो आहे. रितेश हा केवळ पुरस्कार घेण्यासाठी आला नाही तर त्याने महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री सई ताम्हणकर हिच्याबरोबर एक सुंदर डान्स सुद्धा केला. त्याच बरोबर सिद्धार्थ जाधव आणि अमेय वाघ त्यांच्याबरोबर भरपूर मस्ती सुद्धा केली.


रितेशचा वेड चित्रपट प्रेक्षकांना वेड लावण्यात यशस्वी ठरला. आज अख्खा महाराष्ट्र 'मला वेड लावलंय' म्हणताना दिसतो आहे. निर्मिती, दिग्दर्शन, प्रमोशन या टप्प्यावर रितेशने मराठी सिनेमाला एका उंचीवर नेले आहे. त्यामुळे झी टॉकीजने रितेश देशमुखला हा पुरस्कार दिला आहे. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता झी टॉकीज या वाहिनीवर महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? हा सोहळा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे .

Web Title: After 'Ved' Riteish Deshmukh gets another honor, becomes Maharashtra's favorite style icon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.