सुबोध भावे, उर्मिला कानेटकर आणि क्रांती रेडकरमध्ये झाला हा करार...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2016 10:45 AM2016-12-13T10:45:01+5:302016-12-13T12:26:57+5:30
मनोज कोटियन दिग्दर्शित 'करार' या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. करारच्या या टीझरला सोशलमीडियावर भरभरून लाईक्स मिळताना दिसत आहे. 'करार हा एक कौटुंबिक चित्रपट असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाºया समस्या आणि संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
म ोज कोटियन दिग्दर्शित 'करार' या चित्रपटाचा टीझर नुकताच सोशलमीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. करारच्या या टीझरला सोशलमीडियावर भरभरून लाईक्स मिळताना दिसत आहे. 'करार हा एक कौटुंबिक चित्रपट असून, प्रत्येकाच्या कौटुंबिक जीवनात उद्भवणाºया समस्या आणि संघर्ष या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. क्रेक इंटरटेंटमेन्टच्या पूनम सिव्हिया आणि नीलम सिव्हिया यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसेच परेश दवे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहे. संजय जगताप लिखित या चित्रपटाची पटकथा आणि संवाद हेमंत एदलाबादकर यांनी लिहिले आहे. त्याचप्रमाणे या चित्रपटातील गाणीदेखील प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी आहे. या चित्रपटातील गाण्यांचे गुरु ठाकूर आणि मंगेश कांगणे यांनी लेखन केले आहे. संगीतदिग्दर्शक विजय गवंडे आणि परेश शाह यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यांना अवधूत गुप्ते, श्रेया घोषाल, बेला शेंडे, सोनू कक्कर, जसराज जोशी, नेहा राजपाल आणि वैशाली सामंत अशा सुरमयी गायकांचा आवाज लाभला आहे. तसेच करार हा चित्रपट रसिकांना मंत्रमुग्ध करणारा ठरेल यात शंका नाही. आजच्या धावत्या जगात बदलत चाललेली मातृत्वाबाद्दलची मानसिकता सांगणारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट १३ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. तसेच या चित्रपटात अभिनेता सुबोध भावे, क्रांती रेडकर आणि उर्मिला कानेटकर अशा तगडया कलाकारांचा अभिनय प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात ही स्टार कास्ट असल्यामुळे साहजिकच हा चित्रपट पाहाण्याची प्रेक्षकांना उत्सुकता लागली असणार आहे यात शंकाच नाही.