ट्रेंडिंग दाक्षिणात्य गाण्यावर थिरकलं नारकर कपल, अविनाथ-ऐश्वर्या यांचा हा डान्स व्हिडिओ एकदा पाहाच
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 16:17 IST2024-04-23T16:17:41+5:302024-04-23T16:17:58+5:30
ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करण्याची संधी नारकर कपल सोडत नाहीत. आतादेखील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे.

ट्रेंडिंग दाक्षिणात्य गाण्यावर थिरकलं नारकर कपल, अविनाथ-ऐश्वर्या यांचा हा डान्स व्हिडिओ एकदा पाहाच
ऐश्वर्या आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेइंडस्ट्रीतील एव्हरग्रीन कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. नारकर जोडप्याचे अनेक रील व्हिडिओ व्हायरल होत असतात. आत्तापर्यंत त्यांनी अनेक गाण्यांवर डान्स करत व्हिडिओ बनवले आहेत. डान्स करताना नारकर कपलचा उत्साह पाहण्यासारखा असतो. ट्रेंडिंग गाण्यावर डान्स करण्याची संधी ते सोडत नाहीत. आतादेखील ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी दाक्षिणात्य गाण्यावर डान्स केला आहे.
सध्या सोशल मीडियावर illuminati हे गाणं व्हायरल होत आहे. आवेशम सिनेमातील या गाण्यावर अनेक रील्सही व्हायरल होत आहेत. या गाण्यावर ऐश्वर्या आणि अविनाश यांनी जबरदस्त डान्स केला आहे. त्यांचा डान्स पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओत त्यांची एनर्जी लाजवाब आहे. ऐश्वर्या यांनी साडीत डान्स स्टेप्स केल्या आहेत. तर अविनाश नारकर यांनीही भन्नाट डान्स केला आहे. त्यांचा हा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
डान्सबरोबरच त्यांचे फिटनेसचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. ५०च्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या आणि अविनाश यांचा फिटनेस तरुणांनाही लाजवेल असा आहे. अविनाश-ऐश्वर्या व्हिडिओतून चाहत्यांना फिटनेसचे धडे देण्याबरोबरच अनेकदा फिटनेस चॅलेंजही देताना दिसतात.