पूजेला स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्याने ऐश्वर्या नारकर झालेल्या ट्रोल म्हणाल्या- "लोकांनी शिव्या दिल्या..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:07 IST2025-01-13T13:06:50+5:302025-01-13T13:07:14+5:30
"बायकादेखील खूप ट्रोल करतात", ऐश्वर्या नारकर यांचं ट्रोलर्सला स्पष्ट उत्तर, म्हणाल्या...

पूजेला स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्याने ऐश्वर्या नारकर झालेल्या ट्रोल म्हणाल्या- "लोकांनी शिव्या दिल्या..."
ऐश्वर्या नारकर या मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. अभिनयाने त्यांनी एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्या यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून वैयक्तिक जीवन आणि करिअरमधील अपडेट्स त्या चाहत्यांना देत असतात. नवीन व्हिडिओ आणि फोटोदेखील त्या चाहत्यांबरोबर शेअर करतात. पण, अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामनाही करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य करत ट्रोलर्सला चांगलंच उत्तर दिलं आहे.
अभिनयाबरोबरच फिटनेस आणि सौंदर्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या ऐश्वर्या यांनी नुकतीच आरपार या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी ट्रोलिंगबाबत भाष्य केलं. महिलादेखील ट्रोल करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सत्यनारायण पूजेला स्लीव्हलेस ब्लाऊज घातल्याने झालेल्या ट्रोलिंगवरही त्यांनी त्यांचं मत मांडलं. त्या म्हणाल्या, "बायकादेखील खूप ट्रोल करतात. मला असं वाटतं की बाईने बाईला सपोर्ट करायला पाहिजे. मी सत्यनारायण पूजेचं एक रील टाकलं होतं. त्यात मी स्लीव्हलेस ब्लाऊज घालून सत्यनारायण पूजेला बसले होते. त्याच्यावरुन मला लोकांनी शिव्या घातल्या होत्या. ते वाचून मला असं झालं होतं की यांच्या घरातल्या लेकी सुनांना काय होत असेल".
"काय आपली मराठी संस्कृती, काय आपले दंड दाखवायचे असं लिहिलं होतं. मग सीतेने कंचुकी वापरल्याच ना. तेव्हा ती फॅशन नव्हती तेव्हा ती गरज होती. आपल्याकडे आता जरी फॅशन म्हणून आली असेल तरी असं काय उघडं नागडं कोणी फिरलेलं नाहीये. आणि जे कोणी फिरत असतील तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अशाच बायकांच्या अकाऊंटला फॉलोवर्स असतात. कारण, तेच बघायला आवडतं. पण ही विकृती आहे", असंही त्या पुढे म्हणाल्या.