अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 05:40 PM2023-01-19T17:40:18+5:302023-01-19T17:51:30+5:30

अजय-अतुल यांचं संगीत असलेले ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie | अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

अजय-अतुलच्या मना गाण्याने वैदेही-अमेयच्या ‘जग्गू आणि जुलिएट’ला लावले चारचाँद!

googlenewsNext

पुनित बालन स्टुडिओज् निर्मित ‘जग्गू आणि जुलिएट’ या चित्रपटात अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी हे मुख्य भूमिकेत आहेत, हे आपल्याला मोशन पोस्टरमधून समजलंच होतं. त्यानंतर आलेल्या टीझरलाही प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. आता या चित्रपटातील एक आकर्षक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अजय-अतुल यांचं सांगीत या चित्रपटाला असल्यानं प्रेक्षक यातील गाण्यांच्या प्रतिक्षेत होते, आणि आता ‘मना’ हे कलरफुल गाणं रिलीज झाल्यानं प्रेक्षकांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.

‘मना’ या गाण्यात कोळीवाड्यातला जग्गू, अमेरिकेच्या जुलिएटसमोर आपलं प्रेम व्यक्त करताना दिसतोय... दिलखुलास गाणं म्हणताना दिसतोय आणि जुलिएटच्या उत्तराकडे डोळे लावून बसलेला दिसतोय. तर जुलिएटच्या मनाची अवस्था काहीशी भांबावल्यासारखी झालेली दिसते. मात्र, दोघांच्या डोळ्यात एकमेकांसाठी भरभरून प्रेम दिसतंय. ‘मना’ या गाण्याला अजय-अतुलचे शब्द आणि संगीत लाभले असून हे गाणे अजय यांनी गायले आहे. तर महेश लिमयेंच्या दिग्दर्शनाने त्यात नानाविध रंग भरले आहेत. 

‘पुनीत बालन स्टुडिओज्’ने यापूर्वी निर्मिती केलेला सामाजिक विषयावरील ‘मुळशी पॅटर्न’च्या सुपरहिट यशानंतर आता ‘जग्गू आणि जुलिएट’च्या रूपात नवीकोरी रोमँटिक लव्हस्टोरी प्रदर्शित होत आहे. पुनीत बालन स्टुडिओज् निर्मित, अजय-अतुल म्युझिकल आणि महेश लिमये यांच्या दिग्दर्शनाची आणि कॅमेऱ्याची जादू दाखवणारा ‘जग्गू आणि जुलिएट’ १० फेब्रुवारी रोजी आपल्या भेटीस येत आहे.

Web Title: Ajay-Atul give music for Vaidehi-Amey wagh's Jaggu and Juliet movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.