अजय-अतुलची झाली फजिती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2016 06:05 PM2016-10-17T18:05:41+5:302016-10-17T18:05:41+5:30
अजय-अतुल या संगीतकार जोडीने मराठीच काय तर हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिले आहे. यांच्या संगीताची ...
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
अजय-अतुल या संगीतकार जोडीने मराठीच काय तर हिंदी चित्रपटांना देखील संगीत दिले आहे. यांच्या संगीताची जादू आजही रसिकांवर चढलेली दिसते. अजय-अतुलची कोणतीही गाणी सुपरहिट झाल्याशिवाय राहात नाहीत. प्रेक्षकांनी या जोडीवर भरभरुन प्रेम केले आहे. अनेक वर्षांपासून अजय-अतुल लाईव्ह हा कार्यक्रम करीत आहेत. अशाच एका लाईव्ह कार्यक्रमाच्यावेळी या दोघांची चांगलीच फजिती झाल्याचे समजते आहे. अलीकडेच औरंगाबादमध्ये वेरुळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान दोघांचे 'मल्हारवारी...' हे गाणे सुरू होते. मात्र हे गाणे सुरु असतानाच अचानक साउंड ट्रँक बंद पडला आणि गोंधळ झाला. साउंड ट्रॅक बंद पडल्यामुळे अजय अतुल यांच्यासह वादक गाणे लाइव्ह सादर न करता साउंड ट्रॅकवर लीप मूव्हमेंट करत असल्याचे म्हटले जात आहे. अचानक आवाज बंद पडल्याने वादक आणि खुद्द अजय-अतुल यांना काय करावे हा प्रश्न पडला. हजारो रसिकांसमोर कार्यक्रमात व्यत्यय आल्याने अजय-अतुल संतापले. यावेळी पॉवर कट झाल्याचे सांगत तंत्रज्ञांनी बाजू सावरुन धरण्याचा प्रयत्न केला. अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी हजरजबाबी निवेदनातून कार्यक्रम सावरुन धरला. कार्यक्रमात एकदा हा घोळ झाल्यानंतर मात्र कुठेही पुन्हा ट्रॅकवर गाणे वाजवण्यात आले नाही. अजय अतुल यांनी पुढची सर्व गाणी लाइव्ह सादर केली. अजय अतुल सोबत या महोत्सवाला स्वप्निल बांदोडकर, कुणाल गांजावाला, अभिजीत सावंत, योगिता गोडबोले हे कलाकार उपस्थित होते. या सर्व प्रकरणावर अजय-अतुल यांनी मात्र अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.