'ति'च्या जाण्याने मराठी अभिनेता वर्षभर सावरु शकला नाही, म्हणाला, "ब्रेकअपनंतर..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 13:44 IST2023-05-12T13:42:36+5:302023-05-12T13:44:55+5:30
आधी मालिका सुपरहिट ठरली तर आता तो सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे.

'ति'च्या जाण्याने मराठी अभिनेता वर्षभर सावरु शकला नाही, म्हणाला, "ब्रेकअपनंतर..."
'मन उडू उडू झालं' या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) सध्या आपल्या कामांमध्ये प्रचंड व्यस्त आहे. आधी मालिका सुपरहिट ठरली तर आता तो सिनेमांमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. अजिंक्य 'टकाटक' या सिनेमात दिसला होता तर आता त्याचा नवीन चित्रपट 'सरी' रिलीज झाला आहे. सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने अजिंक्यने मुलाखती दिल्या. यावेळी त्याने ब्रेकअपमधून सावरायला १ वर्ष लागल्याचं सांगितलं.
अजिंक्य म्हणाला,"ब्रेकअप झाल्यानंतर मुली रडू शकतात, मन मोकळं करु शकतात. अर्थात मुलांनीही असं केलं पाहिजे. पण मुली हळव्या असल्यामुळे त्या बोलून मोकळ्या होतात. मला मात्र ब्रेकअपमधून सावरायला एक वर्षापेक्षा जास्त काळ लागला. सहा महिन्यांपूर्वी मी यावर बोलूच शकलो नसतो."
तो पुढे म्हणाला," करायचं तर डायरेक्ट लग्नच करायचं, शेवटपर्यंत जायचं, टाईमपास नाही असं अगोदरच ठरलेलं होत. पण आता मला खूप भीती वाटते, माझ्यासाठी हे खूप अवघड वाटायला लागलं आहे, त्यामुळे आता लग्न वगैरे नकोच असा ठाम निर्णय मी घेतलाय. अगदीच कोणी चांगली मुलगी भेटली आणि झालं तर ती गोष्ट वेगळी."
अजिंक्यच्या बोलण्यावरुन कळतं की तो त्या नात्यात किती गुंतला होता. मात्र काही गोष्टी नशिबातच नसतात. ते विसरुन पुढे जायचं असतं. अजिंक्यचा मुख्य भूमिका असलेला 'सरी' हा सिनेमाही नात्यातील गुंतागुंत आणि प्रेम यावर आधारित आहे. सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.