आकाश ठोसर देतोय सकारात्मकतेचा संदेश, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 13:41 IST2021-03-19T13:40:39+5:302021-03-19T13:41:21+5:30
Akash Thosar spreading positive vibes. चेहऱ्यावर हास्य असलेल्या या फोटोसह समर्पक अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शननेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आकाश ठोसर देतोय सकारात्मकतेचा संदेश, सोशल मीडियावर शेअर केला फोटो
आपल्या फॅन्सशी आकाश ठोसर कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून कनेक्ट असतो. आपले आगामी सिनेमा आणि त्याची माहिती फॅन्ससह शेअर करत असतो. तसेच आपल्या फॅन्ससह काही चांगले विचारही शेअर करत असतो.
नुकताच आकाशने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. चेहऱ्यावर हास्य असलेल्या या फोटोसह समर्पक अशी कॅप्शन दिली आहे. या कॅप्शननेच साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या भूमिकांसोबतच आकाश त्याच्या हटके स्टाईलमुळे रसिकांचं लक्ष वेधून घेतो. त्याची हटके आणि आकर्षक ड्रेसिंग स्टाईल कायमच रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली आहे.
शूटिंगवर जाणं असो किंवा मग एखाद्या कार्यक्रमात उपस्थित राहणं, दरवेळी आकाश आपल्या हटके आणि आकर्षक ड्रेसिंगने रसिकांची मनं जिंकतो.
त्यामुळेच की काय नुकतंच त्याने सोशल मीडियावर शेअर केलेला फोटो रसिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. पूर्णपणेडॅशिंग लूकमधला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. आकाशची स्टाईल स्टेटमेंट रसिकांनाही भावली आहे. त्याच्या फॅन्सकडून यावर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव सुरू आहे.