Nagraj Manjule: -अन् मी प्रचंड घाबरलो...; नागराज अण्णांनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलातील किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2023 11:52 AM2023-02-05T11:52:21+5:302023-02-05T11:56:38+5:30

Nagraj Manjule: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात नागराज अण्णांनी एक धम्माल किस्सा ऐकवला. लंडनमधील हा किस्सा ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही...

akhil bhartiy sahitya sammelan Nagraj Manjule share funny story | Nagraj Manjule: -अन् मी प्रचंड घाबरलो...; नागराज अण्णांनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलातील किस्सा

Nagraj Manjule: -अन् मी प्रचंड घाबरलो...; नागराज अण्णांनी सांगितला लंडनच्या फाईव्ह स्टार हॉटेलातील किस्सा

googlenewsNext

वर्ध्यात 96 वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. 17 वं विद्रोही मराठी साहित्य संमेलन देखील आयोजित करण्यात आलंय. या संमेलनाला अभिनेता आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे (Nagraj Manjule), अभिनेते सयाजी शिंदे (Sayaji Shinde) या मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गजांनीही हजेरी लावली. आपले अनुभव शेअर केलेत. यावेळी नागराज अण्णांनी एक धम्माल किस्सा ऐकवला. लंडनमधील हा किस्सा ऐकून उपस्थितांना हसू आवरलं नाही. तुम्हालाही हा किस्सा ऐकून हसू आवरणार नाही.


 
काय होता तो किस्सा...
तर किस्सा अर्थातच लंडनचा आहे. नागराज अण्णा पहिल्यांदा लंडनला गेले होते. याच लंडनवारीचा एक मजेशीर किस्सा त्यांनी अगदी रंगवून रंगवून सांगितला. ते म्हणाले, 'मी पहिल्यांदाच लंडनला गेलो होतो. त्याआधी भारतात कधीही फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाण्याचा योग आला नव्हता. परंतु लंडनमध्ये हा योग आलाच.  मी आणि माझे दोन निर्माते मित्र आम्ही एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबलो होतो. स्टुडिओ अपार्टमेंटसारखी रूम आम्हाला मिळाली होती. रोज सकाळी उठल्यानंतर माझे मित्र चहा बनवायचे. सकाळची न्याहारी झाली की आम्ही चित्रपट महोत्सवासाठी बाहेर पडत असू.  एके दिवशी सकाळी मित्र खोलीत काही आलेच नाहीत. त्यामुळे मी स्वतः चहा बनवण्याचा निर्णय घेतला.

खोलीत चहा बनवण्यासाठी एक इलेक्ट्रिक टी मेकर होता. त्याआधी इलेक्ट्रिक टी मेकर वापरण्याचा प्रश्नच नव्हता. पण आज प्रयत्न करून बघू तरी म्हणून मी त्या मेकरमध्ये पाणी टाकलं प्लगसुद्धा जोडला आणि तो मेकर थेट उचलून शेगडीवर ठेवला. थोड्या वेळानं अचानक माझं लक्ष शेगडीकडे गेलं. पाहतो काय तर त्या टी मेकरमधून प्रचंड धूर निघत होता. दुसऱ्याच क्षणी खोलीतील सायरन वाजायला लागला. ते सगळं पाहून मी प्रचंड घाबरलो. काय करावं, हेही कळेना. सायरनचा आवाज ऐकून हॉटेलमधील स्टाफ पळत माझ्या खोलीत आला. काय झालं, असा त्यांचा पहिला प्रश्न होता. पण मला इंग्लिश येत नव्हतं, त्यांना काय सांगणार ? त्यांनी परिस्थिती पाहून सर्व समजून घेतलं. मला नवीन टी मेकर आणून दिला. शिवाय  इलेक्ट्रिक टी मेकरमध्ये चहा बनवायलाही शिकवलं. नागराज अण्णांचा हा मजेशीर किस्सा ऐकून संमेलनात एकच हशा पिकला.

Web Title: akhil bhartiy sahitya sammelan Nagraj Manjule share funny story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.