अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर; प्रशांत दामले झाले विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 06:41 PM2023-04-17T18:41:40+5:302023-04-17T18:48:40+5:30
दोन्ही गटांमधील हा सामना मोठा चुरशीचा झाला. यात प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी झाले आहेत.
गेले काही दिवस चर्चेचा विषय ठरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषदे(Akhil Bhartiya Marathi Natya Parishad)च्या निकाल जाहिर झाला आहे. ‘रंगकर्मी नाटक समूह’ आणि ‘आपलं पॅनल’ आमनेसामने उभे ठाकले होते. दोन्ही गटांमधील हा सामना मोठा चुरशीचा झाला. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी आणि फेरमोजणीनंतर अखेर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषेदच्या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निवडणुकीत प्रशांत दामले (Prashant Damle) विजयी झाले आहेत.
उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निकालची रंगकर्मी पाहत आहेत. मुंबई मध्यवर्ती शाखेतील 10 जागांपैकी 8 जागांवर प्रशांत दामलेंच्या (Prashant Damle) रंगकर्मी नाटक समूहाच्या उमेदवारांचा विजय मिळवला आहे. उर्वरित दोन जागांवर प्रसाद कांबळींच्या आपलं पॅनलचे प्रसाद कांबळी आणि सुकन्या कुलकर्णी-मोने विजयी झाल्या आहेत. मुंबई उपनगरात दोन जागा प्रशांत दामलेंच्या पॅनलला मिळाल्या तर दोन जागा प्रसाद कांबळींकडे गेल्या आहेत.
'रंगकर्मी नाटक समूह' पॅनल
प्रशांत दामले यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ‘रंगकर्मी नाटक समूह’ या पॅनलची माहिती सोशल मीडियाद्वारे दिली होती. त्यांच्या या पॅनलमध्ये अनेक दिग्गज कलाकार आहेत. या पॅनलमध्ये विजय केंकरे, अजित भुरे, सयाजी शिंदे, विजय गोखले, वैजयंती आपटे, सुशांत शेलार, सविता मालपेकर यांचा समावेश आहे.
'आपलं पॅनल'
प्रसाद कांबळी यांच्या ‘आपलं पॅनल’मध्ये सुकन्या मोने, मंगेश कदम, राजन भिसे, ऐश्वर्या नारकर, अविनाश नारकर, अशोक नारकर, संतोष काणेकर, सुनील देवळेकर, दिगंबर प्रभू, राजन भिसे हे कलाकार आहेत.