आमीरसाठी एकवटली सैराट टिम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 12:37 PM2017-01-04T12:37:43+5:302017-01-04T12:37:43+5:30
आमिर खान यांच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप'साठी तयार करण्यात आलेले गाणे प्रदर्शित झाले आहे. अजय - अतुल यांनी संगीतबध्द ...
आ िर खान यांच्या 'सत्यमेव जयते वॉटर कप'साठी तयार करण्यात आलेले गाणे प्रदर्शित झाले आहे. अजय - अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या या गाण्यात आमिरची पत्नी किरण रावचा स्वरसाज ऐकायला मिळतो. अजय गोगावलेचाही यात मुख्य आवाज आहे. विशेष म्हणजे या गाण्यात आमिर खानसह 'सैराट' फेम आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरुही आहेत. नागराज मंजुळेने या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आमिरसाठीच ही ‘सैराट’ टीम एकत्र आली आहे असे म्हणावे लागेल. अतिशय लक्षवेधी असणाऱ्या या गाण्याच्या व्हिडिओमध्ये आमिर खान, नागराज मंजुळे, फातिमा सना शेख, सई ताम्हणकर, अजय-अतुल, सल्या-लंगड्या, आकाश ठोसर, रिंकू राजगुरु, जिंतेंद्र जोशी, सुनिल बर्वे ही कलाकार मंडळी सुद्धा दिसत आहेत.
महाराष्ट्राला दुष्काळाने अनेक वर्षे छळले आहे. यावर मात करण्यासाठी राज्य सरकारने 'जलयुक्त शिवार' योजनेची सुरुवात केली. आमिर खानच्या 'सत्यमेव जयते टीम'ने यासाठी मोलाची भागीदारी केली. पाण्याचे संधारण व्हावे आणि शेतकऱ्यांना दुष्काळापासून संरक्षण मिळावे यासाठी ही योजना कार्यरत आहे. आमिर खानने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी 'सत्यमेव जयते वॉटर कप' ही स्पर्धा आयोजित केली होती. याचा लाभ महाराष्ट्रातील असंख्य गावांना होत आहे.
गेल्या वर्षी या स्पर्धेत ११६ गावांनी भाग घेतला होता. यामध्ये १,१३६८ कोटी लिटर पाणी वाचवण्यात आले होते. याबद्दल स्पर्धेचे खूप कौतुक करण्यात आले होते. या वर्षी म्हणजेच २०१७ हे वर्ष स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. यामध्ये राज्यातील ३० तालुक्यांचा समावेश आहे.