चुंबक या चित्रपटाद्वारे अक्षय कुमार पुन्हा वळला मराठी चित्रपटसृष्टीकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 11:35 AM2018-06-11T11:35:45+5:302018-06-11T17:11:31+5:30
एक अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमारने आतापर्यंत हटक्या विषयांवरच्या चित्रपटांची निवड केली आहे आणि तो त्याच्यामागे खंबीरपणे उभा ...
ए अभिनेता आणि निर्माता म्हणून अक्षय कुमारने आतापर्यंत हटक्या विषयांवरच्या चित्रपटांची निवड केली आहे आणि तो त्याच्यामागे खंबीरपणे उभा राहिला आहे. आता तो मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. चुंबक या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच प्रस्तुतकर्ता म्हणून तो प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. ‘रुस्तम’मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या या हरहुन्नरी कलाकाराने विविधांगी भूमिकांनी अनेक चित्रपट गाजवले आहेत. ‘पद्मश्री’ने सन्मानित या कलाकाराने जेव्हा मराठी चित्रपट ‘चुंबक’ पाहिला तेव्हा त्याने तो प्रभावित झाले आणि या चित्रपटाची प्रस्तुती करण्याची जबाबदारी त्याने घेतली आहे.
सोशल मीडियाद्वारे ही बातमी अक्षय कुमारने आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्याने एक व्हिडिओ द्वारे ही माहिती आहे. “काहीतरी अत्यंत प्रामाणिक आणि शुद्ध पाहण्याचा योग आला...ती गोष्ट माझ्या डोक्यात एखाद्या ‘चुंबका’सारखी पक्की बसली आहे. ती तुमच्याबरोबर शेअर करावीशी वाटली. मला तुमचे केवळ एक मिनिट हवे आहे.”
प्रख्यात लेखक, गायक, अभिनेता आणि दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे हे चुंबकमध्ये मध्यवर्ती भूमिकेत आहेत. होतकरू कलाकार साहिल जाधव आणि संग्राम देसाई हेसुद्धा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकांमधून पदार्पण करत आहेत. चुंबकचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते संदीप मोदी यांनी केले असून चित्रपटाचे लेखन त्यांनी सौरभ भावे यांच्याबरोबर केले आहे. नरेन कुमार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
अक्षय कुमार प्रस्तुत मराठी चित्रपट 'चुंबक' संपूर्ण महाराष्ट्रात २७ जुलै २०१८ रोजी प्रदर्शित होत आहे.
७२ मैल एक प्रवास ... या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने केली होती. या चित्रपटात स्मिता तांबे, चिन्मय संत, श्रवणी सोळस्कर, चिन्मय कांबळी, इशा माने यांच्या मुख्य भूमिका होत्या. आता अक्षय चुंबक या चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा मराठी चित्रपटसृष्टीकडे वळला आहे. त्याच्या ७२ मैल एक प्रवास या चित्रपटाद्वारे चुंबक चित्रपट देखील प्रेक्षकांना आवडेल अशी या चित्रपटाच्या टीमला खात्री आहे.

Also Read : बॉलिवूडमधील या प्रसिद्ध अभिनेत्याला एमएस धोनी या चित्रपटात साकारायची होती धोनीची भूमिकाCame across something very honest and pure...it has been stuck in my head like Chumbak, thought of sharing it with you all. हे पहा, मला तुमचा फक्त एक मिनिट हवा आहे. @ChumbakTheFilm@SwanandKirkire#ChumbakTheFilmpic.twitter.com/YIykGeuZ0m— Akshay Kumar (@akshaykumar) June 11, 2018