अक्षय दिसणार 'पाईपलाईन'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2016 01:31 PM2016-10-26T13:31:44+5:302016-10-26T13:31:44+5:30

   अभिनेता अक्षय टकसाळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करू लागला आहे. पोश्टर गर्ल, वाय झेड या चित्रपटातील अक्षयच्या भूमिका ...

Akshay will appear in the pipeline | अक्षय दिसणार 'पाईपलाईन'मध्ये

अक्षय दिसणार 'पाईपलाईन'मध्ये

googlenewsNext
style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">   अभिनेता अक्षय कसाळे अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करू लागला आहे. पोश्टर गर्ल, वाय झेड या चित्रपटातील अक्षयच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत. ओ काका हे गाणे तर अक्षयच्या झक्काल स्टाईलमुळे चांगलेच गाजले होते. सध्या अक्षय करतोय तरी काय असा प्रश्न बºयाच जणांना पडला असेल. बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात अक्षय आपल्याला लवकरच दिसणार आहे.  त्याचबरोबर तो प्रेक्षकांना पाईपलाईन या आगामी चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. पाईपलाईन या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात आपल्याला प्राजक्ता माळी आणि सुव्रत जोशी ही नवीन जोडी दिसणार हे तर सर्वांनाच माहितीय. पण अक्षयची देखील या चित्रपटात एंट्री झाली आहे. नुकतेच सोशल मीडियावर अक्षयचा, प्राजक्ता आणि सुव्रत सोबतचा मस्त धमाल करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. अक्षयने काढलेला हा सेल्फी सध्या सोशल साईट्सवर चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. या चित्रपटात अक्षयची भूमिका काय असणार हे मात्र अजुन तरी गुलदस्तायतच आहे. लवकरच आपल्याला अक्षयच्या भूमिकेविषयी समजेल. परंतु त्याच्या प्रत्येक चित्रपटाती भूमिका या वेगळ्या आणि लक्षवेधी असतात यात काही शंकाच नाही. वाय झेड मधील त्याने साकारलेल्या भूमिकेसाठी अक्षयला अनेक पुरस्कारांसाठी नामांकने देखील मिळाली आहेत. आता पाहुयात त्याला या चित्रपटासाठी किती पुरस्कार मिळतात ते. पाईपलाईन  या चित्रपटाच्या चित्रीकरणाला काही दिवसांपुर्वीच सुरुवात झाली आहे. आता पाईपलाईन या चित्रपटात अक्षय काय कमाल करणार हे आपल्याला काही दिवसात समजेलच. 

Web Title: Akshay will appear in the pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.