माझा बाप्पा किती गोड दिसतो...! लाडक्या गणरायासोबत मराठी अभिनेत्रींचं सुंदर फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 13:17 IST2021-09-10T13:13:37+5:302021-09-10T13:17:22+5:30
Ganesh Festival 2021 : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... !! हे सुंदर फोटो तुम्ही एकदा तरी पाहायलाच हवेत...

माझा बाप्पा किती गोड दिसतो...! लाडक्या गणरायासोबत मराठी अभिनेत्रींचं सुंदर फोटोशूट
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया... अशा जयघोषात बाप्पा विराजमान झालाय. बाप्पाचे आगमन म्हटल्यावर सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण आहे. अनेक मराठी सेलिब्रिटींच्याही घरी गणरायाचे आगमन झालेय. मराठी अभिनेत्रींनी खास मराठमोळ्या साजात बाप्पासोबत खास फोटोशूट केलं आहे. हे सुंदर फोटो तुम्ही एकदा तरी पाहायलाच हवेत... (Ganesh Festival 2021)
पाहुया तर...
आपल्या पाठकबाई अर्थात अक्षया देवधर हिनं बाप्पासोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. माझा बाप्पा किती गोड दिसतो... असं गाणं ती गुणगुणतेय.
अभिनेत्री उर्मिला कोठारे हिने बाप्पाच्या मुर्तीसोबत फोटो शेअर करत गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया, आपणास व आपल्या परिवारास मंगलमय शुभेच्छा असं तिनं लिहिलंय.
आला आला माझा गणराज आला, म्हणत मराठमोठी अभिनेत्री कृतिका गायकवाड हिने बाप्पासोबत मस्तपैकी फोटोशूट केलं आहे. पिवळ्या रंगाची साडी, नाकात नथ, कपाळावर चंद्रकोर असा मराठमोळा साज करत, तिनं बाप्पाचं स्वागत केलं.
अभिनेत्री अमृता धोंगडे हिनेही बाप्पासोबत सुरेख पोज देत मस्तपैकी फोटोशूट केलं आहे. तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते... गणेश चतुर्थीला भेट घडते... असं लिहित तिनं चाहत्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिनेत्री राजेश्वरी खरात हिनेही बाप्पासोबत फोटोशूट केलं आहे. लाल भरजरी नऊवारी नेसून तिनं बाप्पासोबत पोज दिल्या आहेत.