'माहेरची साडी' चित्रपट पाहून आजही रडतात बायका; कसा मिळाला होता अलका कुबल यांना हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 02:44 PM2023-09-23T14:44:25+5:302023-09-23T14:45:29+5:30

अख्या महाराष्ट्राची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अलका कुबल यांचा आज वाढदिवस.

Alka Kubal on Maherchi Sari movie | 'माहेरची साडी' चित्रपट पाहून आजही रडतात बायका; कसा मिळाला होता अलका कुबल यांना हा चित्रपट

Alka Kubal

googlenewsNext

अख्या महाराष्ट्राची लाडकी 'लक्ष्मी' अर्थात अलका कुबल यांचा आज वाढदिवस.  23 सप्टेंबर 1963 रोजी झाला होता.  'माहेरची साडी' या सिनेमातून त्या घराघरात पोहोचल्या. आपल्या सहज सुंदर अभिनयानं आणि बोलक्या डोळ्यांनी प्रेक्षकही ढसाढसा रडवलं. महिला वर्गाने तर हा सिनेमा अक्षरश: डोक्यावर घेतला होता. आजही माहेरची साडी हा चित्रपट टीव्हीवर लागला की, तो पाहिल्याशिवाय चाहते राहत नाही. या चित्रपटापासून अलका ताईंची आदर्श सून म्हणून झालेली ओळख आजही तशीच आहे. 

परंतु फारच कमी लोकांनां माहिती असेल, की या सिनेमासाठी निर्मात्यांची पहिली पसंत अलका कुबल नव्हत्या. अलका कुबल यांनी आधीच भरपूर सिनेमे केले होते. अलका यांचा चेहरा सगळ्यांना माहिती होता. विजय कोंडगे यांना 'माहेरची साडी'साठी नवा चेहरा हवा होता. म्हणून त्यांनी 'मैने प्यार किया' या चित्रपटातून लोकांनां अक्षरशः वेड लावणाऱ्या भाग्यश्री पटवर्धन विचारले होते. पण, काही कारणास्तव भाग्यश्री यांनी तो चित्रपट नाकारला. यावेळी दुसऱ्या नायिकेचा शोध सुरू होता. तेव्हा पुन्हा एकदा अलका कुबल यांच्या नावाचा विचार करण्यात आला.

 एन. एस वैद्य आणि पितांबर काळेंसारख्या दिग्गजांच्या आग्रहाखातर विजय कोडगेंनी अलका कुबल यांची भेट घेतली. पण, मानधन कमी मिळत असल्याने अलका कुबल यांनी माहेरची साडी हा चित्रपट नाकारला होता. पण, मानधनाची अपेक्षा न करता चित्रपट करावा असे अनेकांनी सुचवल्यावर चित्रपट केल्याचे अलका कुबल यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. 

अखेर अलका यांनीच लक्ष्मीची भुमिका साकारली आणि आपल्या अभिनयाने चित्रपट हीट ठरवला. प्रत्येक बाईला हा चित्रपट आपला वाटून गेला. 'लक्ष्मी' या भूमिकेमुळं अलका कुबल घराघरातं पोहचल्या. 'माहेरची साडी'शिवाय अलका कुबल या अपूर्ण आहेत, असं त्या स्वत:च मान्य करतात.

'माहेरची साडी' हा चित्रपट  १८ सप्टेंबर १९९१ साली रिलीज झाला होता. कोटींची कमाई करणाऱ्या 'माहेरची साडी' या सिनेमाचं प्रत्येकी तिकीट फक्त चार रुपये होतं.  या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन विजय कोंडके यांनी केली होती.  तर प्रमुख भूमिकेत अलका कुबल यांच्यासोबत रमेश भाटकर, उषा नाडकर्णी, आशालता, विक्रम गोखले, अजिंक्य देव होते.  अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. आजही लग्न समारंभात 'सासरला ही बहीण निघाली.. भावाची लाडी.. नेसली माहेरची साडी' हे गाणं डोळ्यांच्या कडा पाणवतं. 

Web Title: Alka Kubal on Maherchi Sari movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.