अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या - 'बऱ्याच वर्षांनी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 08:41 PM2022-07-16T20:41:02+5:302022-07-16T20:41:29+5:30

Alka Kubal And Ajinkya Dev : 'माहेरची साडी' चित्रपटानंतर अलका कुबल आणि अजिंक्य देव फारसे चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी त्या दोघांची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली आहे.

Alka Kubal shared a photo with Ajinkya Dev and said - 'After many years...' | अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या - 'बऱ्याच वर्षांनी...'

अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत म्हणाल्या - 'बऱ्याच वर्षांनी...'

googlenewsNext

मराठी सिनेइंडस्ट्रीतील नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) यांनी आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. तिने अनेक मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. रुपेरी पडद्यावर सून, लेक अशा व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल यांनी त्यांच्या भूमिकेतून रसिकांची मने जिंकली आहेत. असा त्यांचा गाजलेला एक चित्रपट आहे माहेरची साडी. अलका कुबल, रेणूका शहाणे, रमेश भाटकर, विक्रम गोखले, अजिंक्य देव, विजय चव्हाण, अशी स्टारकास्ट असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली आहे. आजही हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटात अलका कुबल आणि अंजिक्य देव यांनी साकारलेली बहिण भावाचे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटानंतर अलका कुबल आणि अजिंक्य फार चित्रपटांमध्ये दिसले नाहीत. मात्र अनेक वर्षांनी त्या दोघांची ग्रेट भेट थेट लंडनमध्ये झाली.

अलका कुबल यांनी अजिंक्य देव यांच्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, 'बऱ्याच दिवसांनी लंडनमध्ये भेट'. दोघांना पाहून चाहत्यांना भलताच आनंद झाला आहे. त्यांच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. एका चाहत्याने लिहिले की, बहीण भाऊ, तर दुसऱ्या युजरने म्हटले की, माहेरची साडी भाऊ बहिण बॅक. आणखी एका युजरने लिहिले की, सासरला ही बहीण निघाली ,भावाची लाडी, नेसली माहेरची साडी. या चित्रपटातील बहीण भाऊ विक्रम शिंदे आणि लक्ष्मी शिंदे .


माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अलका कुबल यांनी लक्ष्मी शिंदेची भूमिका साकारली होती. तर अंजिक्य देव यांनी लक्ष्मीच्या लहान भावाची विक्रम शिंदेची भूमिका साकारली होती. भावा बहिणींचं प्रेम चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळालं होते. अभिनेत्री अलका कुबल या सध्या लंडनमध्ये एका मराठी चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. अभिनेता लोकेश गुप्ते चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. चित्रपटात आतापर्यंत अलका कुबल यांच्यासह, सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत हे कलाकार प्रमुख भूमिकेत असल्याचं पाहायला मिळालं होतं. 

Web Title: Alka Kubal shared a photo with Ajinkya Dev and said - 'After many years...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.