अलका कुबल यांची लेक घेणार उत्तुंग भरारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2017 03:34 PM2017-06-06T15:34:26+5:302017-06-06T21:10:19+5:30

मराठी चित्रपट सृष्टीत दमदार अभिनयाच्या जोरावर एक आगळे-वेगळे स्थान निर्माण करणाºया अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांची मुलगी ईशानी उत्तुंग भरारी ...

Alka Kubal take the lake to catch! | अलका कुबल यांची लेक घेणार उत्तुंग भरारी!

अलका कुबल यांची लेक घेणार उत्तुंग भरारी!

googlenewsNext
ाठी चित्रपट सृष्टीत दमदार अभिनयाच्या जोरावर एक आगळे-वेगळे स्थान निर्माण करणाºया अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांची मुलगी ईशानी उत्तुंग भरारी घेण्यास सज्ज झाली आहे. आता तुम्ही विचार कराल की, ईशानी कुठल्या चित्रपटात झळकणार आहे, तर ती चित्रपटात झळकणार नसून, एक वैमानिक म्हणून ती स्वत:ला सिद्ध करणार आहे. 



अलका आणि समीर आठल्ये यांची लाडकी कन्या ईशानीने वयाच्या २३व्या वर्षीच हे यश मिळवले आहे. ईशानीला व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळाला असून, ती तिच्या स्वप्नाच्या दिशेने भरारी घेणार आहे. वास्तविक कलाकारांची मुले शक्यतो आपल्या परिवाराचा वारसा पुढे घेऊन जाण्याच्या विचाराने इंडस्ट्रीतच करिअर करण्याला प्राधान्य देतात. परंतु ईशानी यास अपवाद असून, तिने लहानपणीच वैमानिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. आज ईशानीला स्वप्न पूर्ण होत असल्याचा आनंद होत आहे. 



खरं तर ईशानीने २०१५ सालीच अमेरिकेत व्यावसायिक वैमानिकाचा परवाना मिळवला होता. मात्र तिला भारतात वैमानिक म्हणून काम करायचे होते. त्यासाठी तिने अनेक परीक्षा दिल्या. अखेर तिला भारतात परवाना देण्यात आला. दरम्यान, आपल्या मुलीने मिळवलेल्या यशामुळे अलका कुबल-आठल्ये यांना खूप आनंद झाला आहे. लेकीने मिळवलेल्या यशाचे वर्णन करताना त्यांना शब्द अपुरे पडत आहे. तिने लहानपणीच वैमानिक व्हायचे ठरवले होते. मध्ये मी तिला अन्य क्षेत्रात करिअर करायचे का, असे विचारले. मात्र ती आपल्या ध्येयावर ठाम राहिली. अखेर आज तिला हे यश मिळाले, असे अलका यांनी सांगितले. 
 


तर आपण स्वीकारलेल्या करिअरच्या वेगळ्या वाटेविषयी ईशानी म्हणाली, ‘मला आई-वडिलांसारखे कलाकार व्हायचे नव्हते. तसेच चाकोरीबद्ध नोकरीही करायची नव्हती. त्यापेक्षा मला विमान आणि विमानतळावर काम करणाºयांचे आकर्षण वाटायचे. त्यातूनच मी या क्षेत्रात आले.’

Web Title: Alka Kubal take the lake to catch!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.