आलोक राजवाडेचा ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2018 04:44 PM2018-10-17T16:44:19+5:302018-10-17T16:44:57+5:30
चित्रपट व नाटकात अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता आलोक राजवाडेने अभिनयासह नाटकाचे दिग्दर्शन सक्षमरित्या केले आहे आणि आता तो चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
चित्रपट व नाटकात अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारा अभिनेता आलोक राजवाडेने अभिनयासह नाटकाचे दिग्दर्शन सक्षमरित्या केले आहे आणि आता तो चित्रपट दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. आलोकच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ असे असून विशेष म्हणजे या चित्रपटाची मुंबई फिल्म फेस्टीव्हल २०१८ साठी निवड करण्यात आली आहे.
आलोक राजवाडेने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. त्याने या सिनेमाचे पोस्टर शेअर करून लिहिले की, पहिला सिनेमा. या चित्रपटाची कथा धर्माधिकारी सुमंत यांनी लिहीली असून या चित्रपटामध्ये अभिनेता अभय महाजन प्रमुख भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री पर्ण पेठे त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचा पोस्टर पर्ण व सई ताम्हणकरने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामुळे या चित्रपटात सई देखील असणार अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. या चित्रपटाच्या कथेबाबत अद्याप काहीही समजू शकलेले नाही.
FIRST FILM | PRODUCED BY RRP CORP. PVT. LTD. | OFFICIAL SELECTION MAMI 2018 | 💕
1,602 Likes, 36 Comments - आलोक राजवाडे (@alokrajwade) on Instagram: "FIRST FILM | PRODUCED BY RRP CORP. PVT. LTD. | OFFICIAL SELECTION MAMI 2018 | 💕"
आलोकने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच अनेक चित्रपटाच्या दिग्दर्शनाचीही जबाबदारी स्वीकारल्याचे पाहायला मिळाले आहे. ‘तिची सात प्रकरणं’, ‘गेली एकवीस वर्ष’, ‘दिल -ए-नादान’, ‘नाटक नको’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे आता आलोक पुन्हा एकदा ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ या चित्रपटाच्या माध्यमातून दिग्दर्शक म्हणून रसिकांच्या समोर येणार आहे. प्रेक्षक आलोकच्या या आगामी सिनेमाबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत.