"यापासून कायम लांब पळत गेलो...", सिद्धार्थ चांदेकरने सांगितले 'त्या' गोष्टीबद्दल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 16:40 IST2024-01-22T16:40:10+5:302024-01-22T16:40:38+5:30
सिद्धार्थ चांदेकर लवकरच 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात तो सई ताम्हणकरसोबत झळकणार आहे.

"यापासून कायम लांब पळत गेलो...", सिद्धार्थ चांदेकरने सांगितले 'त्या' गोष्टीबद्दल
सिद्धार्थ चांदेकर मराठी सिनेइंडस्ट्रीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. तो लवकरच श्रीदेवी प्रसन्न चित्रपटात पाहायला मिळणार आहे. यात तो सई ताम्हणकरसोबत झळकणार आहे. नुकतेच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, जी चर्चेत आली आहे.
सिद्धार्थ चांदेकर याने इंस्टाग्रामवर श्रीदेवी प्रसन्न चित्रपटातील फोटो शेअर करत लिहिले की, तुमच्या भीतीवर मात करण्यासाठी पहिले पाऊल. नाच ह्या गोष्टीपासून कायम लांब पळत गेलो. कधीच जमणार नाही असं वाटायचं. आता कुठे जरा आत्मविश्वास आला आहे. आता पळणार नाही. खूप नाचणार. ही संधी दिल्याबद्दल टीप्स मराठीचे आभार मानतो. माझ्यातील बेस्ट पप्पू मलूने बाहेर काढले. क्राईममध्ये भागीदार झाल्याबद्दल सई ताम्हणकरचे आभार मानेन तेवढी कमीच आहे. आणि या उत्कृष्ट कृतीसाठी रितेश देशमुख आणि श्रेयस तळपदे यांना ट्रिब्युट. तुमच्या भावनांशी कोणीही बरोबरी करू शकत नाही, तुमचा आदर दाखवण्याचा माझा हा नम्र प्रयत्न आहे. कृतज्ञ.
सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकरचा 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट ४ फेब्रुवारी २०२४ रोजी रिलीज होत आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस पडला आहे. 'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपटाचे लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. तर विशाल विमल मोढवे हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर अमित राज यांनी संगीत दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.