अमेयने साजरा केला रंगभूमीवर वाढदिवस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2016 05:47 PM2016-11-15T17:47:17+5:302016-11-15T17:47:17+5:30

प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा एक खास दिवस असतो. हा दिवस आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरा व्हावा अशीदेखील प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपला वाढदिवस फॅमिली, मित्रमंडळीसोबत साजरा करत असतात. मात्र वाढदिवसा दिवशीदेखील कलाकार आपल्या कामातच व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी अभिनेता सिध्दार्थ जाधव याने आपला वाढदिवस गेला उडता या नाटकाचा प्रयोग करून साजरा केला होता. आता अभिनेता अमेय वाघने देखील आपला वाढदिवस अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचा प्रयोग करून साजरा केला आहे.

Amey celebrated birthday on theater | अमेयने साजरा केला रंगभूमीवर वाढदिवस

अमेयने साजरा केला रंगभूमीवर वाढदिवस

googlenewsNext
रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस हा एक खास दिवस असतो. हा दिवस आपल्या जवळच्या माणसांसोबत साजरा व्हावा अशीदेखील प्रत्येकाची इच्छा असते. कोणी आपला वाढदिवस फॅमिली, मित्रमंडळीसोबत साजरा करत असतात. मात्र वाढदिवसा दिवशीदेखील कलाकार आपल्या कामातच व्यग्र असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकताच काही दिवसांपूर्वी अभिनेता सिध्दार्थ जाधव याने आपला वाढदिवस गेला उडता या नाटकाचा प्रयोग करून साजरा केला होता. आता अभिनेता अमेय वाघने देखील आपला वाढदिवस अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचा प्रयोग करून  साजरा केला आहे.  १३ नोव्हेंबर रोजी अमेयचा वाढदिवस होता. यादिवशी नागपूर येथे अमर फोटो स्टुडिओ या नाटकाचे दोन प्रयोग करण्यात आले. या प्रयोगावेळीच अमेयचा वाढदिवस रंगभूमीवर साजरा करण्यात आला आहे. या नाटकच्या टीमने रंगभूमीवरच केक कापून अमेयला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी अभिनेता सुनिल बर्वे, सुव्रत जोशी आदि कलाकार पाहायला मिळत आहेत. त्याचा हा वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ अमेयने सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्याचबरोबर अमेयने एक पोस्टदेखील अपडेट केली आहे. तो त्याच्या  पोस्टमधून सांगतो, माझ्यासाठी हा वाढदिवस खूपच खास होता. दोन्ही प्रयोगावेळी माझा वाढदिवस साजरा करण्यात आला यासाठी माझ्या टीमचे, प्रेक्षकांचे खरचं खूप मनापासून आभार मानतो. अमेयने दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. तसेच त्याचा नुकताच घंटा हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे. आता तो महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Web Title: Amey celebrated birthday on theater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.