अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटचा झी स्टुडिओजला 'दे धक्का'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 01:07 PM2020-03-04T13:07:09+5:302020-03-04T13:08:08+5:30

अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटने झी स्टुडिओजला धक्का दिला आहे.

Amey Khopkar Entertainment's won against Zee Studios regarding De Dhakka Movie | अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटचा झी स्टुडिओजला 'दे धक्का'

अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटचा झी स्टुडिओजला 'दे धक्का'

googlenewsNext


अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटने झी स्टुडिओजला धक्का दिला आहे. 'दे धक्का २'च्या निर्मितीबाबत उच्च न्यायालयाने निकाल दिला असून आता अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटच 'दे धक्का २' ची निर्मिती करणार असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

जवळपास आठ-दहा महिन्यांपूर्वी अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटकडून 'दे धक्का २' या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यापूर्वी 'दे धक्का' या चित्रपटाची निर्मिती झी कडून करण्यात आली होती. त्यामुळे दे धक्काचे हक्क झीकडे असून, दे धक्का २ ची निर्मिती अमेय खोपकर एण्टरटेन्मेंटला करता येणार नाही असे झीचे म्हणणे होते. या वरून निर्माण झालेला वाद सहा महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयात गेला.

उच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन नुकताच त्यावर निकाल दिला. उच्च न्यायालयाने झीचा दावा फेटाळून 'दे धक्का २'च्या निर्मितीचा अधिकार अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे अमेय खोपकर एंटरटेन्मेंटला दे धक्का २ या चित्रपटाची निर्मितीचा मार्ग मोकळा झाला आहे. 


उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत अमेय खोपकर म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे स्वागत आहे, तसेच 'दे धक्का २' या चित्रपटाच्या टीमचे त्यांनी घेतलेल्या कष्टांसाठी अभिनंदन करतो.

Web Title: Amey Khopkar Entertainment's won against Zee Studios regarding De Dhakka Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.