'Happy Anniversary ट्रॅव्हल पार्टनर!', अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 11:23 AM2024-07-03T11:23:29+5:302024-07-03T11:23:45+5:30

अमेयनं आपल्या बायकोसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला.

Amey Wagh Shared Special Video Post To Wishes Wife Sajiri Deshpande On Wedding Anniversary | 'Happy Anniversary ट्रॅव्हल पार्टनर!', अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

'Happy Anniversary ट्रॅव्हल पार्टनर!', अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला खास व्हिडीओ

 प्रसिद्ध अभिनेता अमेय वाघ (Amey Wagh) हा त्याच्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध आहे. नाटक, सिनेमा आणि वेब सीरिजमधून प्रेक्षकांची पसंती मिळवणाऱ्या अमेयनं आपल्या बायकोसाठी एक खास व्हिडीओ शेअर केला. नुकताच त्याच्या लग्नाचा वाढदिवस झाला. त्यानिमित्ताने त्याने ही पोस्ट केली. सोशल मीडियावर अभिनेता कायम सक्रिय असतो. 

अमेय वाघने २०१७ मध्ये त्याची बालमैत्रीण आणि प्रेयसी साजिरी देशपांडे हिच्याशी पुण्यात लग्नगाठ बांधली होती. २ जुलै रोजी अमेयच्या लग्नाला सात वर्ष पूर्ण झाल्याने अभिनेत्याने खास इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने व्हिडीओला दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहलं, 'आपल्याला कुठे जायचे आहे आपल्यालाच माहिती नाहिये….पण आपला प्रवास तर भारी चालू आहे ना! Happy Anniversary travel partner!'. 

अमेय आणि साजिरी हे दोघे धमाल-मस्ती करताना या व्हिडीओमध्ये दिसून येत आहेत. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओवर आदित्य सरपोतदार, शर्वरी लोहकरे, वैदेही परशुरामी यांसारख्या अभिनेत्रींनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपटसृष्टीतील काही मित्रमंडळींसह अभिनेत्याच्या असंख्य चाहत्यांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत अमेय-साजिरी या दोघांचेही कौतुक केले आहे.

अमेय वाघ हा अलिकडेच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'काला पानी' या सीरिजमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याच्या भुमिकेत झळकला होता. या सीरिजमधील त्याच्या पात्राच विशेष कौतुक झालं. याआधी तो "असूर" या सीरिजमधूनही प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याशिवाय, अमेयने 'मुरांबा', 'झोंबिवली', 'धुरळा', 'गर्लफ्रेंड', 'अनन्या', 'जग्गू आणि ज्युलिएट' या चित्रपटांत महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 
 

Web Title: Amey Wagh Shared Special Video Post To Wishes Wife Sajiri Deshpande On Wedding Anniversary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.