अमित चारीचे 'बाप्पा मोरया' गाणे ठरते हिट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 07:15 AM2019-09-09T07:15:00+5:302019-09-09T07:15:00+5:30

आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमितने मात्र कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले.

Amit Chari's song Bappa Morya becomes a Hit Album | अमित चारीचे 'बाप्पा मोरया' गाणे ठरते हिट

अमित चारीचे 'बाप्पा मोरया' गाणे ठरते हिट

googlenewsNext

प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपतीच्या आराधनेने  होते, हे सर्वश्रुत आहे. त्यातच आता अवघ्या काही दिवसांतच बाप्पाचे आगमनही होणार आहे. हाच दुग्धशर्करा योग साधत, गायक अमित चारी गणेशोत्सवाचे वातावरण अधिकच प्रसन्न, भक्तिमय करण्यासाठी घेऊन येत आहेत, 'बाप्पा मोरया' हा खास अल्बम. पेशाने व्यावसायिक असलेले अमित चारी आपली संगीत क्षेत्रातील वाटचाल बाप्पाच्या आशीर्वादाने करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'बाप्पा मोरया' हा अल्बम नुकताच भाविकांच्या भेटीला आला आहे.अमित चारीने सुरुवातीपासूनच संगीताची आवड होती, ही आवड त्यांनी 'बाप्पा मोरया' या मराठी अल्बमच्या निमित्ताने जपली. आजच्या काळात तरुणाईला प्रादेशिक भाषांची भुरळ असतानाच अमितने मात्र कारकिर्दीची सुरुवात करण्यासाठी आपल्या मातृभाषेला प्राधान्य दिले. 

आपल्या या अल्बमविषयी अमितने सांगतिले की,  '' मुळात मी गायक नसून, संगीत ही माझी आवड आहे. आवड असेल तर सवड ही मिळतेच, त्यानुसार माझी गायनाची आवड मी जपत आहे. काही इतर प्रोजेक्ट्सवरही काम सुरु आहे. आजवर बॉलिवूड, पंजाबी गाण्यांमध्ये असलेली भव्यता 'बाप्पा मोरया' मध्ये दाखवण्यात आली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा यात पुरेपूर वापर करण्यात आला असून भव्य सेट, गुलालाची उधळण, उल्हासित, उत्साही वातावरण या सर्वानेच तुम्हीही निश्चितच भारावून जाल. सिनेसृष्टीत अनेक चांगले गायक आहेत, चांगली गाणी चित्रित करण्यात आली आहेत, मात्र हे गाणेही तितकेच धमाकेदार असेल. हे गाणे श्रोत्यांना नक्कीच आवडेल आणि या गणेशोत्सवात हे गाणे त्यांच्या ओठांवर सतत रेंगाळेल.' असून लवकरच संगीतातील काही नवीन प्रोजेक्ट्सच्या माध्यमातूनही ते आपल्या समोर येणार आहेत.

Web Title: Amit Chari's song Bappa Morya becomes a Hit Album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.