अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच ‘फुगे’सिनेमात स्वप्नील-सुबोधचा 'दोस्ताना ' !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2017 08:23 AM2017-02-07T08:23:58+5:302017-02-07T13:53:58+5:30

मैत्री असते जीवाला जीव लावणारी, ती असते निस्वार्थ. मैत्रीत कोणतीही बंधनं नसतात. मैत्रीसाठी मित्र काहीही करु शकतात. मग ती ...

Like Amitabh Bachchan and Shatrughan Sinha, 'Phog' | अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच ‘फुगे’सिनेमात स्वप्नील-सुबोधचा 'दोस्ताना ' !

अमिताभ बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्याप्रमाणेच ‘फुगे’सिनेमात स्वप्नील-सुबोधचा 'दोस्ताना ' !

googlenewsNext
त्री असते जीवाला जीव लावणारी, ती असते निस्वार्थ. मैत्रीत कोणतीही बंधनं नसतात. मैत्रीसाठी मित्र काहीही करु शकतात. मग ती रियल असो किंवा रिल, मित्रांची दुनिया ही न्यारीच असते. धम्माल, मजा-मस्ती, रुसवे-फुगवे आणि वेळ पडली तर एकमेकांसाठी खांद्याला खांदा लावून उभे राहण्याची तयारी असलेले मित्र. मैत्रीच्या आणाभाका घेत एकमेकांसाठी जीव ओवाळून टाकण्याची तयारी असलेले मित्र रियल लाइफमध्ये आपल्या आजूबाजूला असतातच मात्र रिल लाइफमध्येही मैत्रीवर आधारित विविध सिनेमा आले आहेत. शोलेमधील जय वीरु, यारी है इमान मेरा यार मेरा जिंदगी म्हणणारे अमिताभ-प्राण, सलामत रहे दोस्ताना म्हणणारे अमिताभ आणि शत्रुघ्न सिन्हा आणि मराठमोळी दुनियादारी. अशा एक ना अनेक सिनेमांमधून मैत्रीचे विविध पैलू रसिकांनी रुपेरी पडद्यावर अनुभवले आहेत. आता याच मैत्रीवर आधारित एक नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला येत आहे. मैत्रीच्या घनिष्ट नात्यावर आधारित फुगे या सिनेमात पहिल्यांदाच स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांना पाहायला मिळणार आहे. फुगे हे आनंदाचे प्रतीक आहे आणि त्यामुळेच प्रमोशनमधून या सिनेमाची टीम फुगे वाटप करत चाहत्यांना आनंदी राहण्याचा संदेश देत आहेत. या अंतर्गत टीम फुगेने पुण्यातील एचआयव्ही पीडित मुलांचं संगोपन करणा-या मानव्य या सामाजिक संस्थेला भेट दिली.यावेळी तिथल्या मुलांना गायक स्वप्नील बांदोडकरने गायनाचे धडे देखील दिले. पुण्यात नव्याने स्थापन झालेल्या त्याच्या म्युजीकल इंस्टीटयूट मधील एक प्राध्यापक महिन्यातून एकदा या संस्थेतील मुलांना गायनाचे धडे मोफत देईल असे आश्वासन त्याने दिले. तसंच वेळ मिळाल्यास स्वतःहून आवर्जून उपस्थित राहणार असल्याचंही त्याने सांगितले.  
 
मानव्य संस्थेतील मुलांनी देखील आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करत, मोठ्या उत्साहात फुगे टीमसोबत काही क्षण घालवले. अशाप्रकारे प्रेम आणि मैत्री यावर भाष्य करणारा हा सिनेमा मनोरंजनासोबतच आयुष्य स्वच्छंदी जगण्याचा सल्ला देखील देऊन जात आहे.'फुगे' हे आनंदाचे प्रतिक असल्यामुळे लोकांना आनंदी राहण्याचा संदेश या सिनेमाच्या माध्यमातून चित्रपटाची टीम देत आहे, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष फुग्यांचे वाटप या सिनेमाची टीम करत आहे. याच योजनेअंतर्गत फुगेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील एच. आय.व्ही. पिडीत मुलांचे संगोपन करणाऱ्या मानव्य या एनजीओमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या मुलांना दिले, तसेच अगर मला वेळ मिळाल्यास मीदेखील इथे मार्गदर्शन देण्यास हजर राहत जाईल, असेही त्याने पुढे सांगितले.या चित्रपटांची गाणी देखील मजेशीर आणि तरुणाईना भुरळ घालणारी आहेत. त्यातील संगीत दिग्दर्शक अमितराजच्या आवाजातील 'पार्टी दे' हे गाणं चांगलच गाजत असून, रोचक कोहली दिग्दर्शित फुगेच्या शीर्षकगीताने देखील मनमौजी युवकांना आपल्या कवेत घेतले आहे. शिवाय 'काही कळे तुला' हे स्वप्नील-प्रार्थना आणि सुबोध- नीता वर आधारित असलेले प्रेमगीत प्रेमाच्या स्वप्नवत दुनियेत रसिकांना घेऊन जात आहे. स्वप्नील बांदोडकर आणि जाहन्वी प्रभू अरोरा या जोडगोळीने गायलेले हे गाणं मंदार चोळकर यांनी शब्दबद्ध केले असून याला निलेश मोहरीर यांचे संगीत लाभले आहे.प्रार्थना बेहेरे, नीता शेट्टी, मोहन जोशी, सुहास जोशी आणि आनंद इंगळे यांची देखील यात भूमिका असणार आहे. शिवाय बॉलीवूडचे दिग्दर्शक निशिकांत कामत यात खलनायकाच्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे.या सिनेमाची निर्मिती एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांनी केली असून इंदर राज कपूर या सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत.'फुगे' या नावाने हा सिनेमा विनोदी आणि मनोरंजनाची खुमासदार मेजवाणी देणारा आहे, याचा अंदाज प्रथमदर्शनी आला असला तरी, यात नेमके काय आहे, याचे गुपित  येत्या १० फेब्रुवारीला सिनेमा प्रदर्शित झाल्यावरच कळेल. त्यामुळे स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे नव्हे तर स्वप्नील भावे आणि सुबोध जोशी या नवीन दोस्तांचा हा गमतीशीर स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित सिनेमा प्रेमाची बॅकस्टोरी सांगण्यास सज्ज झाला आहे. 

Web Title: Like Amitabh Bachchan and Shatrughan Sinha, 'Phog'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.