अमृता खानविलकर का आहे आनंदित?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 01:29 PM2016-12-17T13:29:52+5:302016-12-17T13:29:52+5:30
प्रत्येक व्यक्ती हा किती ही मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीच्या आठवणीत रमलेला असतोच. सामान्य असो या कोणतीही व्यक्ती ...
प रत्येक व्यक्ती हा किती ही मोठा झाला तरी तो आपल्या बालपणीच्या आठवणीत रमलेला असतोच. सामान्य असो या कोणतीही व्यक्ती त्याला आपल्या बालपणाचे दिवस, बालपण ज्या शहरात गेले त्या शहराविषयीचे प्रेम त्याचबरोबर शहरातील आपली माणसे यांच्याशी वेगळीच एक आपुलकी असते. त्यामुळे तो कितीही मोठया पदावर पोहोचला की, लहानपणीच्या आठवणी, गाव असो या शहर या आठवणीत रमलेला असतोच. जर याच आपल्या बालपणीच्या शहरात एकादया कलाकाराला आपली कला सादर करण्याची संधी मिळाली तर त्याच्या आनंदाला पारा राहत नाही. सध्या अशीच काहीशी परिस्थिती मराठी चित्रपटसृष्ट्रीची सुंदर अभिनेत्री अमृता खानिवलकरची झाली आहे. अमृताने नुकतेच सोशलमीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून सांगते, जगभरात इतके कार्यक्रम केले पण जिथून कलेचा अर्थ समजला त्या माज्या कोथरुड मध्ये वीस वर्षांनी कला सादर करायचा योग आला आहे. तिची ही पोस्ट पाहता अमृता खूपच आनंदित असल्याचे दिसत आहे. अमृताचे बालपण, शिक्षण पुणे याच शहरातून झाले आहे. तसेच ती पुणेच्या कोथरूड येथील एका सोसायटीत राहत होती. त्या सोसायटीमध्ये अमृता बालपणी गणपती उत्सावावेळी डान्स परफॉर्मन्स करायची. याच उत्सावातून तिच्या करिअरला सुरूवात झाली म्हणण्यास हरकत नाही. त्यामुळे अमृता तिच्याच शहरात एक दोन नाही तर तब्बल वीस वर्षानी आपली कला सादर करत असल्यामुळे सध्या आज मैं उपर... अशीच काहीशी परिस्थिती तिची झाली आहे. तिला ही कला सादर करण्याची संधी शास्त्रीय गायक महेश काळे याने दिली आहे. त्यामुळे तिने सोशलमिडीयावरदेखील महेश काळेचे आभार मानले आहे. अमृताने वाजले की बारा या लोकप्रिय गाण्यावर प्रेक्षकांना ठुमके लावण्यास भाग पाडले आहे. तसेच तिने कटयार काळजात घुसली, बाजी, वन वे तिकीट असे अनेक चित्रपट मराठी चित्रपटसृष्ट्रीला दिले आहेत.