अमृता खानविलकरचा 'नटरंग उभा...' गाण्यावरील दिलखेचक अदा पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 18:02 IST2021-06-29T18:01:52+5:302021-06-29T18:02:15+5:30
अमृता खानविलकरचा लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

अमृता खानविलकरचा 'नटरंग उभा...' गाण्यावरील दिलखेचक अदा पाहून व्हाल घायाळ, पहा हा व्हिडीओ
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. तसेच काही दिवसांपूर्वी तिने योगा पोझमधून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिने अमृतकला ही सीरिज सुरू केली असून यामध्ये ती वेगवेगळ्या अंदाजात चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. नुकताच तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात ती नटरंग उभा या गाण्यावर डान्स करताना दिसते आहे.
अमृता खानविलकर हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि नटरंग उभा या गाण्यावर थिरकताना दिसत आहे. या गाण्यातील तिच्या अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत. तिच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
अभिनयासह फॅशन आणि स्टाईलबाबत अमृता तितकीच सजग आहे. ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते. हटके स्टाईल आणि फॅशनमधील स्वतःचे फोटो नेहमीच ती चाहत्यांसह शेअर करत सोशल मीडियावर वाहवा मिळवत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यावर तुम्हाला तिच्या विविध अदा कॅमे-यात कॅप्चर झालेल्या पाहायला मिळतील. सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
अभिनेत्री अमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती मराठी चित्रपट चोरीचा मामलामध्ये झळकली होती. यात तिच्यासोबत जितेंद्र जोशी, क्षिती जोग, हेमंत ढोमे हे कलाकार होते. तर अमृता आगामी चित्रपट पाँडिचेरीमध्ये दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सई ताम्हणकर व वैभव तत्ववादी आणि नीना कुलकर्णी दिसणार आहेत.