अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 18:04 IST2025-01-23T18:03:11+5:302025-01-23T18:04:11+5:30
अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला. पण, त्यांनी अपघाताबद्दल लेकीला काहीही सांगितलं नाही. पण, हात काळा निळा पडल्यावर अमृताला याबद्दल कळालं.

अमृता खानविलकरच्या आईचा रिक्षा अपघात, दुखापत होऊनही लेकीला सांगितलं नव्हतं
Amruta Khanvilkar : मराठी कलाविश्वाची 'चंद्रमुखी' म्हणून अमृता खानविलकरला ओळखलं जातं. आपल्या सहज-सुंदर अभिनयाने अभिनेत्रीने सर्वांना भुरळ घातली आहे. फॅशन असो वा किंवा मग वैविध्यपूर्ण भूमिका, आपलं काम चोखपणे ती पार पाडते. आजवर अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये अमृताने काम केलेलं आहे. याशिवाय तिला उत्तम नृत्यांगणा म्हणून देखील ओळखलं जातं. ती सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता अमृतानं एक व्हिडीओ शेअर केलाय.
अमृताचं तिच्या आईसोबत खास बॉन्डिंग आहे. ती तिच्या आईसोबतचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अशातच अमृताने तिच्या आईचा एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यात अमृताच्या आईच्या हाताला दुखापत (Amruta Khanvilkar Mother Hand Injured) झाल्याचं दिसून येत आहे. अमृताच्या आईचा रिक्षा अपघात झाला आणि यात त्याच्या हाताच कॉलरबोन तुटलं आहे.
व्हिडीओमध्ये अमृता म्हणते, "आमच्या आईसाहेबांनी हात तोडून घेतलेला आहे. नव्या घरी रिक्षाने येत असताना आई आणि आमची मदतणीस ज्या रिक्षात होती. त्या रिक्षाला कुणीतरी धडक दिली. नंतर एक अख्खा दिवस आईने मला काहीच सांगितलं नाही. पुढच्या दिवशी मी सकाळी पाहिलं की, तिचा हात प्रचंड काळा-निळा झाला आहे. तेव्हाही ती काही बोलली नाही. मला म्हणाली की मला लिफ्टचा दरवाजा लागला आहे. तर म्हटलं बघू म्हटलं काय झालं? त्यानंतर आम्ही थेट हॉस्पिटलमध्ये गेलो. तेव्हा कळलं की, तिचा (collarbone) म्हणजेच तुमचा हात तुमच्या शरीराशी जोडतो ते हाड तुटलं आहे".