अमृता खानविलकर आणि तिचा नवरा एकमेकांपासून राहतात दूर, समोर आलं यामागचं कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 19:58 IST2022-04-18T19:57:08+5:302022-04-18T19:58:17+5:30
Amruta Khanvilkar And Himanshu Malhotra: बऱ्याच दिवसांपासून अमृता खानविलकर मुंबईत तर हिमांशू मल्होत्रा दिल्लीत राहतोय. ते दोघे एकमेकांपासून दूर का राहत आहेत, यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.

अमृता खानविलकर आणि तिचा नवरा एकमेकांपासून राहतात दूर, समोर आलं यामागचं कारण
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि नृत्य कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील अभिनेता हिमांशू मल्होत्रा(Himanshu Malhotra)सोबत २०१५ साली लग्न केले आहे. एका वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, बऱ्याच दिवसांपासून अमृता मुंबईत तर हिमांशू दिल्लीत राहतोय. ते दोघे एकमेकांपासून दूर का राहत आहेत, यामागचे कारण नुकतेच समोर आले आहे.
अमृता आणि हिमांशू २००४ साली पहिल्यांदा एकमेकांना भेटले होते. ते डबु रत्नानी यांच्या ऑफिसमध्ये पहिल्यांदा भेटले होते. अमृता आणि हिमांशू एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान काही दिवसांपूर्वी अमृता आपल्या पतीपासून वेगळे राहत असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र, या वृत्तात अजिबात तथ्य नसल्याचे समोर आले होते. यामागचे कारण समोर आले आहे.
अमृता खानविलकर हिच्याकडे अनेक चित्रपट मालिका आणि शोचे काम सुरू असते. त्यामुळे तिला मुंबईत राहावे लागते, तर तिचा पती हिमांशू हा मूळचा दिल्लीचा रहिवासी आहे. तो त्याच्या आईसोबत सध्या तिथे राहतो आहे. दिल्लीमध्ये देखील त्याचे अनेक कामे असतात. त्यामुळे तो दिल्लीत राहतो. मात्र, दोघेही सध्या एकत्रच आहेत. त्यामुळे या बातमीचा अनर्थ काढू नये, असे देखील अमृताने म्हटले आहे.