अमृता खानविलकरला लागली लॉटरी! २०२४मधल्या तिसऱ्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 11:06 AM2024-06-27T11:06:02+5:302024-06-27T11:06:53+5:30
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)साठी २०२४ वर्ष खास ठरणार आहे. या वर्षातील तिसऱ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे.
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)साठी २०२४ वर्ष खास ठरणार आहे. या वर्षातील तिसऱ्या हिंदी प्रोजेक्टमध्ये ती झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने 36 डे (36 Day Web Series) या नव्या प्रोजेक्टची घोषणा केली. तिची ही नवीन सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला देखील येणार आहे. नुकतेच या सीरिजचे दणक्यात प्रमोशन सुरू झाले असून अमृता आणि शरीब हाश्मी (Sharib Hashmi) यांच्या फोटोची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळतेय. या प्रोजेक्टच्या निमित्ताने ते दोघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. फॅमिली मॅन अभिनेत्यासोबत अमृताला काम करताना पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
अमृता खानविलकर कायम नावीन्यपूर्ण आणि कमालीच्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असते आणि अशातच आता ती 36 डेमध्ये नक्की काय भूमिका साकारणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे. २०२४ वर्षात अमृताने उत्तोमोत्तम भूमिका साकारल्या आणि प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. लुटेरे, चाचा विधायक है हमारे ३ आणि आता 36 डेमध्ये दिसणार आहे. 36 डे सीरिजमध्ये अमृता खानविलकरसोबत अनेक उत्कृष्ट कलाकारांची फौज आहे. अमृता आणि शरीब व्यतिरिक्त या सिरीजमध्ये पूरब कोहली, श्रुती सेठ, चंदन रॉय सन्याल, सुशांत देवगीकर, शेरनाझ पटेल, फैशल रशीद, चाहत वीग आणि केनेथ देसाई यांच्या देखील भूमिका असणार आहेत.
अमृता आणि शरीब पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेयर करणार असून ही वेबसीरिज एक रहस्यमय कथा उलगडणार आहे. २०२४ या वर्षातला अमृता हिचा हा तिसरा बॉलिवूड प्रोजेक्ट ठरणार आहे. बॅक टू बॅक बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये दिसणारी अमृता आगामी वर्षात अनेक नवनवीन भूमिका देखील साकारणार असल्याचे कळतंय. ती कलावती , ललिता बाबर, पठ्ठे बापूराव या मराठी चित्रपटात देखील झळकणार आहे. अमृता सध्या ड्रामा ज्युनियरमध्ये पाहायला मिळत आहे. ती परिक्षकाच्या खुर्चीत बसून बच्चे कंपनीला मार्गदर्शन करताना दिसते आहे.