Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ"
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 19:25 IST2024-07-10T19:25:03+5:302024-07-10T19:25:58+5:30
Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरने इंस्टाग्राम स्टोरीवर सासूच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितले.

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकरला आवडतो सासूच्या हातचा हा पदार्थ, म्हणते -"सर्वात स्वादिष्ट पदार्थ"
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra) सोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान अमृताने इंस्टाग्राम स्टोरीवर सासूच्या हातचा कोणता पदार्थ आवडतो याबद्दल सांगितले.
अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मीडियावर सक्रीय असून ती माध्यमातून ती चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने इंस्टाग्राम स्टोरीवर एका पदार्थ खात असतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती पिन्नी हा पदार्थ खात आहे, जो तिच्या सासूबाई म्हणजेच अंजू मल्होत्रा यांनी बनवला आहे. यात अभिनेत्री म्हणतेय की, माझ्या सासूजींनी बनवलेली पिन्नी. आतापर्यंतचा सर्वात स्वादिष्ट पदार्थ. पिन्नी हा पंजाबी पदार्थ आहे.
अमृता आणि हिमांशुने २४ जानेवारी २०१४ ला लग्न केले. अमृता आणि हिमांशुची ओळख 'इंडियाज सिनेस्टार की खोज' सेटवरच या दोघांची लव्हस्टोरी सुरू झाली होती. भेटल्यापासून या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली आणि त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.जवळपास १० वर्षे दोघेही एकमेकांना डेट करत होते. दोघांचीही चांगली केमिस्ट्री जमली होती.१० वर्ष डेट केल्यानंतर दोघांनीही विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. इंडस्ट्रीत अमृता आणि हिमांशू दोघांकडे एक परफेक्ट कपल म्हणून पाहिले जाते.