अमृता खानविलकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली -'...आता शांत झोप माझी माउली'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2022 12:12 PM2022-08-15T12:12:11+5:302022-08-15T12:12:42+5:30

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याचं सांगितलं आहे.

Amruta Khanvilkar's aunt passed away, She said - '... now sleep peacefully my mauli' | अमृता खानविलकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली -'...आता शांत झोप माझी माउली'

अमृता खानविलकरवर कोसळला दुःखाचा डोंगर, म्हणाली -'...आता शांत झोप माझी माउली'

googlenewsNext

मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) सोशल मीडियावर सक्रीय आहे. या माध्यमातून ती चाहत्यांशी संवाद साधत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिची इंस्टाग्रामवरील पोस्ट चर्चेत आली आहे. अमृता खानविलकरवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या मावशीचे निधन झाले आहे. अमृताने मावशीचा फोटोसोबत भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

अमृता खानविलकर हिने इंस्टाग्रामवर मावशीचा फोटो शेअर करत लिहिले की, आता शांत झोप माझी माउली आता तुला कधीच कुठला त्रास होणार नाही. मनसोक्त आईसक्रीम खा .... छान रहा .... नीट रहा..आणि कसलीच काळजी करू नकोस आता आप्पा आजी तुझी काळजी घेतील. तू परत लहान होऊन जा...तू आजपर्यंत जे जे केलस घरच्यांनसाठी .... आमच्या कुटुंबासाठी त्याची परत फेड आम्ही कोणी करूच शकत नाही. मम्मा ... मी ... अदिती आम्ही खूप लकी होतो कि तुझी सावली होती आमच्यावर नाहीतर आम्ही हरवलो असतो माऊ तुला खूप मिस करणार ग तुला .... खूप...अजून आपल्याला किती फिरायचं होतं..बोलायचं होतं .... मॉम ला …मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं. पण माऊ तू नीट राहा आता तू काळजी करू नकोस.


तिने पुढे लिहिले की, आज मी तुला ज्या प्रकारे पाहिलं ते पाहून मी सुन्न झालीय....मला मावशीपेक्षा तू माझ्यासाठी आई होतीस…. तुला आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांतून जाताना आणि तरीही खंबीरपणे उभं राहून कुटुंबासाठी गोष्टी करताना पाहून मला स्त्रीच्या सामर्थ्याची जाणीव झाली…. आम्हाला स्वतःच्या हातांनी खाऊ घालण्यापासून ते मला आणि अदितीला आमच्या करिअरमध्ये प्रोत्साहन देण्यापर्यंत नेहमीच तुझी साथ राहिली. या जगाच्या शेवटपर्यंत मला तुझी आठवण येईल. तू केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल मी आभारी आहे. आईची काळजी करू नको. मी घेईन तिची काळजी. माऊ, तुझ्या आत्म्याला शांती मिळो.

Web Title: Amruta Khanvilkar's aunt passed away, She said - '... now sleep peacefully my mauli'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.