फुलंवतीसोबत थिरकली चंद्रा! 'मदनमंजिरी' गाण्यावर प्राजक्ता आणि अमृताचा जबरदस्त डान्स, खिळल्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:03 PM2024-12-02T15:03:29+5:302024-12-02T15:03:48+5:30
'फुलवंती' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्यातील 'मदनमंजिरी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. आता प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर एकत्र डान्स केला आहे.
प्राजक्ता माळी तिच्या 'फुलवंती' सिनेमामुळे चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या 'फुलवंती' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरूच आहे. ५० दिवसांनंतरही प्राजक्ता माळीच्या या सिनेमाचे शो काही ठिकाणी हाऊसफुल होत आहेत. 'फुलवंती' सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच त्यातील 'मदनमंजिरी' हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओही व्हायरल झाले होते. आता प्राजक्ता माळी आणि अमृता खानविलकर यांनी या गाण्यावर एकत्र डान्स केला आहे.
'फुलवंती' सिनेमाला मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम आणि भरघोस यशानंतर सक्सेस पार्टी आयोजित करण्यात आली होती. या सक्सेस पार्टीला 'फुलवंती'च्या टीमबरोबर अभिनेत्री अमृता खानविलकर हिनेदेखील हजेरी लावली होती. यावेळी अमृताला मदनमंजिरी गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. प्राजक्तासह अमृता मदनमंजिरी गाण्यावर थिरकली. याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत फुलवंती आणि चंद्रा मदनमंजिरीवर डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, 'फुलवंती'मध्ये मुख्य भूमिका साकारण्याबरोबरच प्राजक्ताने या सिनेमाची निर्मितीही केली आहे. तर स्नेहल तरडेंनी या सिनेमातून दिग्दर्शनात पाऊल टाकलं. प्राजक्ता माळीसह गश्मीर महाजनी या सिनेमात मुख्य भूमिकेत आहे. तर स्नेहल तरडे, प्रसाद ओक, वैभव मांगले, हृषिकेश जोशी या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील काही कलाकारही 'फुलवंती' सिनेमात झळकले आहेत. हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित करण्यात आला आहे.