अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा कधीही एकत्र करणार नाहीत काम, कारण आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2021 07:00 AM2021-12-12T07:00:00+5:302021-12-12T07:00:03+5:30
Amruta Khanvilkar-Himanshu Malhotra:अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्रा यांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते.
मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar)ने आपल्या अभिनय आणि डान्स कौशल्याने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अमृताने हिंदी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेता हिमांशू मल्होत्रा (Himanshu Malhotra) सोबत लग्न केले आहे. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावते. अमृता आणि हिमांशूला एकत्र काम करताना पाहण्यासाठी त्यांचे चाहते खूप उत्सुक आहेत. मात्र त्यांच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर येते आहे. ते दोघे एकत्र काम करताना दिसणार नाहीत, असा खुलासा हिमांशूने एका मुलाखतीत केला.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, मुलाखतीत हिमांशूला अमृतासोबत काम करताना कधी दिसणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर हिमांशू म्हणाला की, अमृता माझ्यासमोर अभिनय करण्यास खूप लाजते. त्यामुळे तुम्ही आम्हाला एकत्र काम करताना पाहणार नाही आहात आणि आमच्यात हीच चर्चा झाली होती. आम्हाला काही ऑफर देखील आल्या होत्या. मात्र त्यावर अमृता म्हणाली की डान्स आणि अभिनय या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. अभिनय आपण एकत्र करू शकत नाही. कारण आपण जर अभिनय एकत्र केला तर प्रत्येक दिवशी आपल्याला एकमेकांसमोर अभिनय करावा लागेल. आपण शक्य तितके वास्तविक राहिले पाहिजे आणि एकत्र अभिनय करू नये असे अमृताला वाटते.
'व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवायला आवडते'
आमच्या दोघांची काम करण्याची वेगवेगळी पद्धत आहे. तिची एक वेगळी टीम आहे आणि माझी स्वतःची वेगळी टीम आहे. मला वाटते की काम करण्याचा आमचा स्वभावही वेगळा आहे, असे हिमांशूने सांगितले. तसेच त्यांना त्यांचे व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवायला आवडते असेही त्याने सांगितले. मात्र हिमांशूचे हे उत्तर ऐकून काही चाहते नाराज झाले आहेत.