'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 05:50 PM2022-02-03T17:50:25+5:302022-02-03T17:50:59+5:30

समांथा रुथ प्रभूवर (Samantha Ruth Prabhu) चित्रीत झालेले गाणे 'ओ अंटावा' (Oo Antava)ने अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिला भुरळ घातली आहे.

Amruta Khanwilkar throws Samantha's song 'O Antawa' in 'Pushpa', video goes viral | 'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

'पुष्पा'मधील समांथाच्या 'ओ अंटावा' गाण्यावर थिरकली अमृता खानविलकर, व्हिडीओ झाला व्हायरल

googlenewsNext

साउथचा स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun)चा नुकताच रिलीज झालेला चित्रपट पुष्पा (Pushpa Movie) २०२१ मधला सर्वात लोकप्रिय चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची जादू फक्त भारतातच नाही तर परदेशातही पोहचली आहे. या चित्रपटाच्या कथानकासोबत यातील गाण्यांनी रसिकांना चांगलीच भुरळ घातली आहे. त्यातील श्रीवल्ली, सामी आणि ओ अंटावा (Oo Antava) या गाण्यांची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या गाण्यांवरील रील सोशल मीडियावर पाहायला मिळतात. दरम्यान समांथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu)वर चित्रीत झालेले गाणे ओ अंटावाने अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) हिला भुरळ घातली आहे. या गाण्यावर अमृता थिरकली असून तिने त्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. 

अमृता खानविलकर अभिनेत्रीसोबतच उत्तम डान्सर आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. ती बऱ्याचदा डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच अमृताने इंस्टाग्रामवर ओ अंटावा गाण्यावर डान्स केला आहे. अमृताचा या गाण्यावरील डान्सला खूप पसंती मिळते आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. अमृताने या गाण्यावर खूप छान डान्स मुव्ह्ज केले आहेत. 


अमृता खानविलकर मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. मराठीसह हिंदी चित्रपटातही आपलं नृत्य आणि अभिनयाची जादू अमृताने दाखवली आहे..राझी', 'सत्यमेव जयते' , 'मलंग' या हिंदी सिनेमात ती झळकली आहे. 

Web Title: Amruta Khanwilkar throws Samantha's song 'O Antawa' in 'Pushpa', video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.