अनंत-राधिकाच्या लग्नात अजय-अतुलचा जलवा, 'वक्रतुंड महाकाय' गाण्याने दुमदुमला लग्नमंडप, व्हिडिओ एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 03:57 PM2024-07-13T15:57:48+5:302024-07-13T16:03:25+5:30

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी अखेर राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला आहे.

anant ambani and radhika merchant wedding marathi singer and composer ajay atul present video viral shankar mahadevan sonu nigam and shreya ghoshal also sing song | अनंत-राधिकाच्या लग्नात अजय-अतुलचा जलवा, 'वक्रतुंड महाकाय' गाण्याने दुमदुमला लग्नमंडप, व्हिडिओ एकदा पाहाच

अनंत-राधिकाच्या लग्नात अजय-अतुलचा जलवा, 'वक्रतुंड महाकाय' गाण्याने दुमदुमला लग्नमंडप, व्हिडिओ एकदा पाहाच

Anant Ambani and Radhika Merchant Wedding : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी अखेर राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला आहे. अनंत आणि राधिकाने शुक्रवारी (१२ जुलै) या दिवशी  सप्तपदी घेत त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली. या शाही विवाह सोहळ्याला अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. तर बॉलिवूडसह राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी या लग्नसमारंभात आपली उपस्थिती दर्शवली. मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य  विवाह सोहळा संपन्न झाला. 

सध्या सोशल मीडियावर या नवविवाहित जोडप्याच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.  अनंत- राधिका यांचा प्री-वेडिंग फंक्शन ते लग्नसमारंभ हा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. गतवर्षी २३ डिसेंबर या दिवशी अनंत अंबानी आणि राधिक मर्चंट यांचा साखरपुडा राजस्थान येथे पार पडला. त्यानंतर राधिकाचा मेंहदी सोहळा असो अथवा मामेरु कार्यक्रम असो या ७ महिन्यांच्या कालावधीत या प्री-वेडिंग कार्यक्रमांची जोरदार चर्चा रंगली. अखेर काल १२ जुलै या दिवशी त्यांनी लग्नगाठ बांधली. या लग्नसोहळ्याला संगीत क्षेत्रातील काही मातब्बर गायकांनीही आपल्या सुरेल गायनाने या मैफिलित चार चॉंद लावले. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर 'Marathicelebkatta' या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

बॉलिवूड गायक  शंकर महादेवन, सोनू निगम तसेच हरिहरन यांच्याबरोबर लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल आदी गायकांनी या लग्नात आपल्या सुरांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. विशेष म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील संगीत दिग्दर्शक, संगीतकार अजय- अतुल  देखील या शाही विवाह सोहळ्यात हजर होते. संगीत क्षेत्रातील या जाणकारांनी लग्नसमारंभातील रसिकांना गायनसेवा दिली. शंकर महादेव यांनी आपल्या मनाला भिडणाऱ्या आवाजाने श्रोत्यांना  घायाळ. शंकर महादेवन या भव्य सोहळ्यात 'वक्रतुंड महाकाय' हे गाणं गाताना दिसतायत. त्यांचा हा व्हायरल व्हिडिओ श्रोत्यांना प्रचंड आवडला आहे. 

Web Title: anant ambani and radhika merchant wedding marathi singer and composer ajay atul present video viral shankar mahadevan sonu nigam and shreya ghoshal also sing song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.