अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठमोळ्या गायिकेची हजेरी, शेअर केला Inside व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 13:17 IST2024-07-16T13:16:43+5:302024-07-16T13:17:11+5:30
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : अंबानींच्या रिसेप्शनमध्ये मराठी कलाकारांचा जलवा, व्हिडिओ आला समोर

अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला मराठमोळ्या गायिकेची हजेरी, शेअर केला Inside व्हिडिओ
Anant Ambani-Radhika Merchant Wedding : गेले काही दिवस जिकडेतिकडे फक्त एका लग्नाची चर्चा होताना दिसत आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मराठमोळी गायिका प्रियांका बर्वे हिनेदेखील अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती.
प्रियांकाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला प्रियांकाने ग्लॅमरस लूक करत हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे. या व्हिडिओतून तिने वेडिंग रिसेप्शन आणि डेकोरेशनची झलक दाखवली आहे. प्रियांकबरोबर अनेक मराठी कलाकारांनीही अनंत-राधिकाच्या लग्नाला हजेरी लावल्याचं व्हिडिओत दिसत आहे. अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी हे कलाकारही दिसत आहेत.
दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडसह या वेडिंग सोहळ्याला हॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन आणि आशीर्वाद सेरेमनीही ठेवण्यात आली होती. अमृता खानविलकर, जितेंद्र जोशी, सोनाली कुलकर्णी, गिरिजा ओक, प्रियांका बर्वे या मराठी कलाकारांना अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनचं आमंत्रण देण्यात आलं होतं.