'आणि मी सध्या डेट करतोय...', अखेर रिंकूसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर आकाश ठोसरनं सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2023 06:00 AM2023-04-01T06:00:00+5:302023-04-01T06:00:00+5:30

Aakash Thosar : आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिर्याणी चित्रपटात झळकणार आहे.

'And I'm currently dating...', finally Akash Toshar left silence on the discussion of his affair with Rinku | 'आणि मी सध्या डेट करतोय...', अखेर रिंकूसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर आकाश ठोसरनं सोडलं मौन

'आणि मी सध्या डेट करतोय...', अखेर रिंकूसोबतच्या अफेयरच्या चर्चेवर आकाश ठोसरनं सोडलं मौन

googlenewsNext

नागराज मंजुळे दिग्दर्शित सैराट (Sairat Movie) चित्रपटातून अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) आणि आकाश ठोसर (Aakash Thosar) एका रात्रीत लोकप्रिय झाले. महाराष्ट्रात ते दोघे आर्ची-परशा या नावाने ओळखले जातात. सैराटमुळे त्यांना खूप लोकप्रियता मिळाली आणि त्यांच्या फॅन फॉलोव्हिंगमध्येही खूप वाढ झाली. रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. ते दोघे रिलेशनशीपमध्ये असल्याची चर्चा वारंवार ऐकायला मिळत असते. नुकतेच आकाश ठोसरने लोकमतच्या नो फिल्टर या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्याने रिंकू सोबतच्या अफेयरच्या चर्चेवर मौन सोडले.

आकाश ठोसर लवकरच घर बंदुक बिर्याणी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सायली पाटील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लोकमतच्या नो फिल्टर कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी आकाश ठोसरला रिंकू सोबत अफेयरच्या चर्चा ऐकायला मिळतात. तर हे खरं आहे का, असे विचारल्यानंतर आकाश म्हणाला की, असं काही नाही...आम्ही खूप चांगले मित्र आहेत. मित्र भेटतो आणि फिरत असतो. आम्ही फक्त चांगले मित्र आहोत.  आकाश रिंकू पेक्षा आर्ची परशा म्हणून लोकांना आम्ही जास्त आवडतो. आमच्यात तसे काही. 


त्यानंतर आकाशला विचारले की, तू कोणाला डेट करतो आहेस का? त्यावर तो म्हणाला की, आकाश सध्या स्वतःलाच डेट करतो आहे. 
आकाश आणि रिंकू हे खूप चांगले मित्र आहेत. एकमेकांना भेटल्यावर हे दोघेही आपल्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. या दोघांनी आता लग्न करायला हरकत नाही किंवा हे दोघे एकमेकांना डेट करत आहेर अशा प्रतिक्रिया मिळाल्यावर आकाश आणि रिंकूला याची फार गंमत वाटते.

खरेतर अशा फोटोंवर फार मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात असल्याने हे दोघे फोटो पोस्ट करून त्याची फक्त मजा घेत असतात. पण हे लोकांचे प्रेम आहे, या प्रेमामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत, हे यश गाठू शकलो आहोत, असे आकाशने याआधी एका मुलाखतीत सांगितले आहे.

Web Title: 'And I'm currently dating...', finally Akash Toshar left silence on the discussion of his affair with Rinku

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.